CM प्रमोद सावंत राजस्थान दौऱ्यावर, परिवर्तन यात्रेत होणार सहभागी

संघटनात्मक काम : भाजपच्या प्रचार-प्रसारात होणार सहभागी
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. ते बुधवारी (ता.20) जयपूर येथे जाण्यास निघतील. दोन दिवसांत ते भाजपच्या संघटनात्मक कामात वेळ देतील. काही ठिकाणच्या परिवर्तन यात्रेत त्यांचा सहभाग असेल. राजस्थानात विधानसभा निवडणूक आहे. त्याची तयारी भाजप करत असून त्यात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळते, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपचे संघटनात्मक काम हे गाव पातळीवरील असो किंवा राष्ट्रीय पातळीवरील असो एकच असते.

आम्ही आमचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवतो, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो. त्यामुळे मध्यप्रदेश, उत्तराखंडनंतर आता राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचार-प्रसारात सहभागी होण्यासाठी वेगळे काही करावे लागणार असे नाही. भाजपची आपली विचारसरणी आहे.

त्यामुळे विकासाच्या आमच्या संकल्पना आणि भाजपशासीत अन्य राज्यातील संकल्पना या एकच असतात. केंद्र व राज्य सरकारचे धोरण एकच असते. त्यामुळे भाजपचा कोणताही नेता कुठेही गेला तरी त्याला मुद्दे शोधण्याची वेळ येत नाही.

उत्तराखंडमध्ये आणि राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे आणि जनता त्या सरकारला कंटाळली आहे. तेथील सरकारांचे प्रगतीपुस्तक शून्य आहे. आम्ही आमच्या राज्यात केलेला विकास जरी तेथील जनतेसमोर मांडला तरी तेथील जनतेने मागील निवडणुकीत केलेली चूक त्या जनतेला समजून चुकते.

केंद्रात भाजपला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याचे नाटक करत असले तरी त्यांचा हेतू स्वच्छ नाही. जनकल्याणासाठी नव्हे तर मोदींना विरोधासाठी ते एकत्र आले आहेत. विरोधकांनी आघाडी केली खरी; पण आपला नेता निवडण्यात त्यांना यश आलेले नाहीत. त्यांच्यातील सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे, ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

CM Pramod Sawant
Women Reservation Bill बद्दल राज्यातील महिला प्रतिनिधींनी व्यक्त केल्या 'या' प्रतिक्रिया...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com