CM Pramod Sawant: 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद' संस्थेवर तब्बल 302 कोटींचा खर्च

CM Pramod Sawant: यात 210 विद्यार्थ्यांना पदवी आणि 56 पदव्युत्तर आयुर्वेदाचे शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: पणजीत 8 ते 11 डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या विश्व आयुर्वेद काँग्रेसच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते धारगळस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आणि अन्य दोन संस्थांचे आभासी पद्धतीने उद्‍घाटन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान त्याच दिवशी उत्तर प्रदेशमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन गाजियाबाद आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी दिल्ली या दोन संस्थांचे उद्‍घाटन करतील.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद ही संस्था 50 एकर जागेवर उभारली असून 302 कोटी रुपये खर्च आला आहे. तेथे 210 विद्यार्थ्यांना पदवी आणि 56 पदव्युत्तर आयुर्वेदाचे शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध असेल.

CM Pramod Sawant
Sand Mining: गोव्यातील शापोरा नदीतून रेतीउपसा व्‍यवसाय लवकरच सुरु होणार

विश्व आयुर्वेद काँग्रेस कला अकादमी, दरबार हॉल राजभवन, बांदोडकर स्टेडियम, आयनॉक्स परिसर, एनआयओ सभागृह या ठिकाणी होईल. या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत 5 हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली असून 30 देशांतील 250 परदेशी प्रतिनिधीही उपस्थित असतील. 150 व्याख्याते आपले विचार मांडतील. शिवाय 450 शोधनिबंध सादर केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com