Verna IDC: सिप्ला कंपनीतील अपघाताचा मुद्दा विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: सिप्ला युनिटमध्ये गुरुवारी झालेल्या अपघातात सांगली आणि कोल्हापूर येथील दोघांचा मृत्यू झाला.
Verna IDC: सिप्ला कंपनीतील अपघाताचा मुद्दा विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
CM Dr. Pramod SawantX Handle
Published on
Updated on

वेर्णा येथील सिप्ला युनिट दोनमधील झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (२५ जुलै) उघडकीस आली. कामगारांचा गुदमरुन झालेल्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आमदार विजय सरदेसाईंनी विधानसभेत उपस्थित केला. याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे सभागृहाला सांगितले.

सिप्ला युनिटमध्ये ब्रिकेट बॉयलर प्लांटमध्ये क्रशर दुरुस्ती करण्यासाठी लिफ्टच्या खड्यात उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे चार वाजता झालेल्या या अपघातात अक्षय पवार (२४) आणि अक्षय पाटील (२७) यांचा मृत्यू झाला.

विजय सरदेसाईंनी विधानसभा अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. सिप्ला कंपनीत गुदमरुन दोन कामगारांचा मृत्यू झाला ही घटना मोठी असून, मृत कामगार गोंयकार असो किंवा परप्रांतीय त्यांना न्याय मिळायला हवा. तसेच, कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप देखील, आमदार सरदेसाई यांनी केला.

Verna IDC: सिप्ला कंपनीतील अपघाताचा मुद्दा विधानसभेत, मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
Verna IDC: गोव्यातील सिप्ला कंपनीत अपघात; सांगली, कोल्हापुरातील दोन कामगारांचा गुदमरुन मृत्यू

याप्रकरणी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंपनी कोणतीही असो याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात सांगितले.

अक्षय पवार आणि अक्षय पाटील ब्रिकेट बॉयलर प्लांटमध्ये क्रशर दुरुस्ती करण्यासाठी लिफ्टच्या खड्यात उतरले असता गुदमरुन खाली कोसळले. बाहेर काढून त्यांना उपचारासाठी दक्षिण जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com