पणजी: राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सध्या गोवा दौऱ्यावर असलेल्या जम्मू काश्मीर मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्राकडून कंपाल पणजी येथील युथ हॉस्टेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या जम्मू-काश्मीर मधील विद्यार्थ्यांचा एक गट गोव्यात आला आहे आणि विचारांची देवाण-घेवाण करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
जम्मू काश्मीर आणि गोवा या दोन वेगवेगळ्या राज्यांबद्दल दरम्यान बरीच चर्चा रंगली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना गोव्यातील खाद्य संस्कृती, राहणीमान आणि इतर महत्वाच्या विषयांबद्दल माहिती दिली तर जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या राज्याची विविधता मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
या चर्चा सत्राच्या दरम्यान दोघांमध्ये विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण झाली. जम्मू-काश्मीर मधून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना काश्मिरी शाल भेट केली, तसेच काश्मिरी पद्धतीच्या अनेक पदार्थांचा आस्वाद देखील मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान घेतला.
सध्या जम्मू-काश्मीरहून ५० विद्यार्थ्यांचा गट गोव्याच्या दौऱ्यावर आला आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी नेहरू युवा केंद्राकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला युवा केंद्राचे कालिदास घाटवळ व अन्य सदस्य उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.