Goa News : स्वच्छ राजकारण, राजकारणी तयार करणे विद्यार्थ्यांच्या हाती : सरदेसाई

श्री दामोदर उच्च माध्यमिकच्या विद्यार्थी मंडळाचे उद्‌घाटन
Goa Politics
Vijai SardesaiCanva, Vijai Sardesai
Published on
Updated on

सासष्टी, स्वच्छ राजकारण व राजकारणी तयार करणे सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या हातात आहे. तुम्‍ही कुठल्याही क्षेत्रात असला तरी राजकारणाचा स्पर्श होतोच.

त्‍यामुळे विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीची जाणीव करून घ्यावी, असे आवाहन गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

मठग्रामस्थ हिंदू सभा संचालित श्री दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी मंडळाचे उद्‌घाटन केल्‍यानंतर सरदेसाई बोलत होते.

मडगावच्या रवींद्र भवनात झालेल्‍या या कार्यक्रमाला मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग ऊर्फ भाई नायक, व्यवस्थापक रिमा कुंदे, व्यवस्थापन कार्यकारी अनिल पै, शिक्षणतज्‍ज्ञ श्रीधर पै काणे, प्राचार्य राजीव देसाई, मंडळ प्रभारी चंद्रकांत शिंदे, परिषद प्रभारी व सरचिटणीस निषाद महाले उपस्थित होते.

या सोहळ्यात पोस्टर, फुलांची सजावट, मेंदी, स्टोन रंगकाम, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन मारिया रिबेलो यांनी केले तर निषाद महाले यांनी आभार मानले.

Goa Politics
Sunburn Goa 2024: 'आम्हाला नको, मोदींच्या राज्यात शिफ्ट करा सनबर्न'; महोत्सवावरुन गोमंतकीय आक्रमक

गोव्याचे व देशाचे भवितव्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे. विद्यार्थी राजकीय प्रक्रियेत वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांनी त्यांना सतावणाऱ्या समस्या सरकारकडे मांडाव्यात. स्वतःच्या हक्कासाठी सरकारशी लढावे.

तसेच लोकशाही व आपल्या शैक्षणिक संस्थेप्रती सदैव आदर बाळगावा. त्यामुळे चांगले राजकारणी घडून व स्वच्छ प्रशासनासाठी विद्यार्थी योगदान देऊ शकतील.

- विजय सरदेसाई, आमदार (फातोर्डा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com