

पणजी : इयत्ता बारावीच्या यंदाच्या परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी चक्क ‘चॅटजीपीटी’चा वापर केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना सर्व विषयांसाठी मिळून शून्य गुण देण्यात आले.
तर, आणखी दोन विद्यार्थी मोबाईल घेऊन केंद्रात आले होते. याची माहिती मिळताच त्यांच्याकडील मोबाईल काढून घेण्यात आले. त्या विद्यार्थ्यांची समितीमार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती गोवा बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदा बारावीचा निकाल ९२.९६ टक्के लागल्याचेही त्यांनी जाहीर केले.
यंदा बारावीची परीक्षा १० ते २७ फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील २० केंद्रांवर झाली. या परीक्षेला एकूण १७,२८३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १६,०६७ विद्यार्थी उत्तीर्ण, तर १,२१६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे यंदा परीक्षेचा निकाल ९२.९६ टक्के इतका लागला. यंदाच्या परीक्षेतही विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना गोवा बोर्डच्या gbshse.in या वेबसाईटवर पाहता येईल, असेही त्यांनी सांगितले.
निकाल असा...
एकूण विद्यार्थी : १७,२८३
उत्तीर्ण : १६,०६७
अनुत्तीर्ण : १,२१६
निकाल : ९२.९६ टक्के
६ वर्षांतील निकाल
वर्ष निकाल (टक्क्यांत)
२०२१ - ९९.४०
२०२२ - ९२.६६
२०२३ - ९५.४६
२०२४ - ८५
२०२५ - ९०.६४
२०२६ - ९२.९६
तालुका निकाल (टक्क्यांत)
पेडणे - ९५.९७
बार्देश - ९५.०२
डिचोली - ९२.९५
तिसवाडी - ९५.११
सत्तरी - ७९.८०
फोंडा - ९०.०१
मुरगाव - ९१.७०
सासष्टी - ९५.१७
सांगे - ८२.७८
केपे - ९२.८६
धारबांदोडा - ७९.५७
काणकोण - ९४.१४
प्रवर्ग - टक्केवारी
खुला - ९२.९८
इतर मागासवर्गीय - ९३.५३
अनुसूचित जाती - ९१.९१
अनुसूचित जमाती - ९२.२७
गुणांनुसार उत्तीर्ण विद्यार्थी
गुण - उत्तीर्ण
३३-४५ - ५५०
४६-५९ - ५,२०१
६०-८० - ८,२८०
८१-१०० - २,०३४
शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
शाखा - टक्केवारी
कला - ९२.२१
वाणिज्य - ९२.९०
विज्ञान - ९३.९०
व्यावसायिक - ९२.२७
यंदाच्या बारावी परीक्षेला ८८८ दिव्यांग विद्यार्थी बसले होते. त्यातील ८५० जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांची टक्केवारी ९५.७२ इतकी भरते. तर, ५०२ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा (रिपिटर) दिलेली होती. त्यातील २४५ जण उत्तीर्ण झाल्याने त्यांची टक्केवारी ४८.८० इतकी असल्याची माहिती ही भगीरथ शेट्ये यांनी दिली.
यंदा परीक्षेला एकूण ८,२०३ विद्यार्थी बसले होते. त्यातील ७,७३८ जण उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ९१.८९ टक्के इतकी आहे. तर, ९,०८० विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यातील ८,५२९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, त्यांची टक्केवारी ९३.९३ टक्के आहे. बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
१बारावीची पुरवणी परीक्षा २७ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येईल. २०२७ ची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होईल, असे भगीरथ शेट्ये यांनी सांगितले.
२ उत्तरपत्रिकांच्या फेरमूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना प्रतिपेपर ३५० रुपये द्यावे लागतील. यासाठी अर्ज करण्यासाठी १ एप्रिल २०२६ पर्यंतची मुदत आहे.
३गुणांच्या फेरमूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना प्रतिपेपर ७०० रुपये द्यावे लागतील. अर्ज करण्यासाठी ८ एप्रिल २०२६ पर्यंतची मुदत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.