Goa: नागरी पुरवठा खात्यातर्फे स्वस्त धान्य दुकानावर कारवाई

गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुलेकर यांनी सदर स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड केले होते.
काल दुपारी धान्याची पोती परत आणून अंकुश रेडकर यांचा स्वस्त धान्य दुकान देताना दुकानदार.
काल दुपारी धान्याची पोती परत आणून अंकुश रेडकर यांचा स्वस्त धान्य दुकान देताना दुकानदार.Dainik Gomantak

वास्को: मुरगाव येथील नागरी पुरवठा खात्याच्या (Civil Supplies) स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्ड (Ration card) शिवाय इतर दुकान मालकाने विकलेले धान्य नागरी पुरवठा खाते वास्को कार्यालयीन निरीक्षकांनी कारवाई करुन परत स्वस्त धान्य दुकानात आणून देण्यास भाग पाडले. याविषयी दुकान मालक अंकुश रेडकर याला 24 तासाच्या आत उत्तर देण्याची नोटीस नागरी पुरवठा खात्यातर्फे(Civil Supplies Account) देण्यात आली आहे. दुकान मालकावर याविषयी कारवाई 'होणार असून त्याविषयी नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांनी आदेश दिला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथील देस्तेरो ब्यूझी बी स्कूल जवळ नागरी पुरवठा विभागाच्या अंकुश रेडकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा काळाबजार होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुलेकर (Parashuram Sonulekar) यांनी सदर स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघड केले होते. त्यानुसार या दुकान मालकाविरुध्द वास्को शहरात चर्चेचा विषय बनला आहे. गरीब जनतेसाठी स्वस्त धान्य रेशनकार्ड धारकांना देण्यात येते. मात्र काही स्वस्त धान्य दुकान चालक धान्याचा काळाबाजार करत असल्याचे यापूर्वीही उघड झाले होते. काल देस्तेरो मुरगाव येथे सोनूर्लेकर यांनी सदर स्वस्त धान्य दुकानातून काळाबाजार होत असल्याचा व्हिडीयो चित्रीकरण करून उघड केले होते.

काल दुपारी धान्याची पोती परत आणून अंकुश रेडकर यांचा स्वस्त धान्य दुकान देताना दुकानदार.
Goa: साखळी पुरातन किल्याच्याच्या नुतनीकरणाची पायाभरणी..!

दरम्यान याची नागरी पुरवठा खात्याने दखल घेऊन आज सकाळी वास्को नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक साळगावकर व इतर कर्मचारी वर्ग सदर स्वस्त दुकानावर जाऊन ज्याला सदर धान्य दिले त्याच्याकडून ते परत आणण्यास भाग पाडले. स्वस्त धान्य दुकान मालकाने ज्याला रेशनकार्डशिवाय दिले होते त्या दुकानदाराने परत आणले. यावेळी त्याला विचारले असता त्याने दुसऱ्याच्या रेशनकार्डवरून धान्य घेतले असल्याचे सांगितले. पण त्याचा पुरावा दाखव असे सांगितलेअ सता तो खोटे बोलत असल्याचे उघड झाले.

दरम्यान सदर स्वस्त धान्य दुकान मालकाला 24 तासाच्या आत देण्याची नोटीस नागरी पुरवठा खात्यातर्फे देण्यात आली आहे. सदर प्रकरण नागरी पुरवठा संचालकाकडे पोचले असून याविषयी कारवाई होणार आहे असे नागरी पुरवठा खात्याचे वास्को (Vasco) कार्यालयीन निरीक्षक साळगांवकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com