Urban Property Card: नागरिकांना मिळणार 'अर्बन प्रॉपर्टी कार्ड', ड्रोनद्वारे होणार मालमत्तांचे सर्वेक्षण; प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहन

Urban Property Card Goa: वर्षानुवर्षे चालत आलेल्या जमिनीच्या जुन्या नोंदी आणि सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी आता सरकारने कंबर कसली आहे.
Goa Urban Property Card
Goa Urban Property CardDainik Gomantaki
Published on
Updated on

मडगाव: वर्षानुवर्षे चालत आलेल्या जमिनीच्या जुन्या नोंदी आणि सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी आता सरकारने कंबर कसली आहे. १९७२ साली करण्यात आलेल्या साखळी व टेपच्या सर्वेक्षणाऐवजी आता अत्याधुनिक ड्रोन आणि डिजिटल उपकरणांच्या साहाय्याने जमिनीचे मोजमाप करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक मालमत्तेचे अचूक रेकॉर्ड उपलब्ध होणार असून, नागरिकांना त्यांचे नवीन ‘अर्बन प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे.

मडगाव भू-सर्वेक्षण विभागातील सर्वेक्षण अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, १९७२ च्या सर्वेक्षणात अनेक तांत्रिक अडचणी आणि चुका होत्या. त्या आता डिजिटल सर्वेक्षणाद्वारे दुरुस्त केल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत ड्रोनद्वारे मालमत्तांचे छायाचित्र आणि अचूक नकाशे तयार केले जात आहेत. यामुळे जमिनीच्या सीमांबाबतचे वाद मिटण्यास मदत होणार आहे.

Goa Urban Property Card
Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

या नवीन डिजिटल प्रॉपर्टी कार्डवर केवळ जमिनीचा नकाशाच नाही, तर मालकाचा फोटो आणि सर्वेक्षण क्रमांकही स्पष्टपणे नमूद केला जाणार आहे. विशेष म्हणजे, एकाच जमिनीचे अनेक मालक असल्यास सॉफ्टवेअरमध्ये त्या सर्वांची नावे समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नागरिकांना आवाहन

हे नवीन प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यासाठी नागरिकांनी आपली मालकी हक्काची कागदपत्रे, जसे की विक्रीखत किंवा इन्व्हेंटरी कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. सध्या अनेक नागरिक ही कागदपत्रे सादर करण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वेक्षण पथकांकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Goa Urban Property Card
Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

कुंकळ्ळी पालिका कार्यालय सुरू

नागरिकांच्या सोयीसाठी सर्वेक्षण पथके प्रत्यक्ष जागेवर जाऊन कागदपत्रे गोळा करत आहेत. कुंकळ्ळी येथील नागरिकांसाठी कुंकळ्ळी नगरपालिकेत एक महिन्यासाठी विशेष कार्यालय सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून नागरिकांना लांब प्रवास करावा लागणार नाही. नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com