Christmas Festival in Goa: गोव्यात फेस्टिव्हल हंगामाच्या पार्श्वभूमीवर विमान तिकीट दरात तिप्पट वाढ

Christmas Festival in Goa: गोव्यात कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटवविल्‍यामुळे मोठ्या संख्येने पर्यटन येत आहे.
Flight | Christmas Festival in Goa
Flight | Christmas Festival in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Christmas Festival in Goa: कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटवविल्‍यामुळे मोठ्या संख्येने पर्यटन गोव्यात येत आहे. नाताळ ते नवीन वर्ष यादरम्यानचा काळ हा गोव्यात फेस्टिव्हल काळ म्हणून साजरा केला जातो. या काळात देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्‍येने गोव्याकडे वळतात. याचा थेट परिणाम विमान तिकिटांवर झाला आहे. इतर राज्यांतून येणाऱ्या विमान तिकीट दरात तिप्पट वाढ झाली आहे.

चेन्‍नई-गोवा वाहतूक प्रवासाचे दर सामान्यपणे 4 हजार रुपये असते. परंतु 24 डिसेंबर रोजी हेच दर 12 हजार रुपयांपर्यंत गेले आहे. तसेच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने या काळात या मार्गावरील तिकीट दर दुप्पट म्हणजे 8 हजार रुपये झाला आहे. तसेच 1 जानेवारीपासून पर्यटक परतणार असून तिकीट 10 हजारांवर पोचले आहे. अशी दरवाढ गोव्यात येणाऱ्या प्रत्येक विमान मार्गावर झाली आहे.

Flight | Christmas Festival in Goa
Goa Assembly Session : गोव्यात आमदारांना आता मिळणार केवळ 5 वर्षांचीच माहिती

मुंबई-गोवा मार्गावर विमानाचे सामान्य दर सुमारे 3400 रुपये असतात. 23 व 24 रोजी 7204 आणि 28 ते 30 दरम्यान 6258 असे ते झाले आहेत. कोलकाता-गोवा मार्गावरील सुमारे 7500 रुपयांवरून 11,299 आणि 28 ते 30 दरम्यान 18,975 रुपयांवर पोहोचला आहे. नवी दिल्ली-गोवा दर सुमारे 6500 रुपये असतो. 23 व 24 रोजी तो 10,521 आणि 28 ते 30 डिसेंबरदरम्यान 11,813 रुपयेांवर पोचला आहे.

बसेसचा तिकीट दरही दुप्‍पट

विमानाची दरवाढ झाल्याने बसेस तिकीट दरवाढही झाली आहे. मुंबई-गोवा मार्गावर एसी सीटर बसचे तिकीट सुमारे 1200 रुपये आहे. तर सुमारे 2400 रुपये स्‍लीपर एसी तिकीट आहे. परंतु 23 व 24 डिसेंबर रोजी सीटर 2400 आणि स्‍लीपर 3500 रुपये झाला आहे. तसेच हाच दर 28 ते 30 तारखेदरम्यानही आहे आणि 1 जानेवारी रोजीसुद्धा तिकिटांचा दर जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com