Chimbel Panchayat: ...अखेर चिंबलमधील वाहतूक कोंडी सुटली, पंचायतीने केली पोकलेनच्या सहाय्याने कारवाई; नक्की काय आहे प्रकरण

पंचायत आक्रमक: पोलिस बंदोबस्तात कारवाईनंतर वाहतूक कोंडी सुटली
Chimbel Panchayat
Chimbel PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

Chimbel Panchayat इंदिरानगर - चिंबल येथील बसथांब्याच्या ठिकाणी असलेले बेकायदेशीर गाडे पोलिस बंदोबस्तात आज हटवण्यात आले. सुमारे 28 गाडेधारकांना चिंबल पंचायतीने हे गाडे हटवण्याची नोटीस बजावून 30 मे 23 पर्यंत मुदत दिली होती.

मात्र, त्यांनी ते न हटविल्याने पंचायतीने पोकलेनच्या आज मदतीने हटवले. या कारवाईमुळे त्या ठिकाणी वाहतुकीची होणारी कोंडी दूर झाली आहे. चिंबलच्या काही ग्रामस्थांनी हे गाडे हटवण्यासाठी तक्रार दाखल केली होती.

Chimbel Panchayat
Goa Police: महागड्या कॅमेऱ्याची लेन्स चोरणाऱ्यास पणजी पोलिसांनी केली अटक, संशयित मूळचा बंगळुरूचा

चिंबल येथील कोमुनिदादच्या जमिनीत गेल्या काही वर्षापूर्वी बेकायदेशीर गाडे उभारण्यात आले होते. हे गाडे तेथील वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. वाहनांना जाण्यासाठी येण्यासाठी तेथील अरुंद रस्ता ही डोकेदुखी बनली होती.

दुपारच्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून चालताना अडथळा येत होता. वेळोवेळी चिंबल ग्रामस्थांनी ग्रामसभेत त्याविरुद्ध आवाज उठविला होता. मात्र, कारवाईकडे दुर्लक्ष केले जात होते. ग्रामस्थांनी त्यांची मागणी लावून धरल्याने अखेर पंचायतीने हे सर्व गाडे आज हटवण्यात आले.

Chimbel Panchayat
Leopard Dead at Dharbandora: बिबट्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

गाडेधारकांचा विरोध बंदोबस्तामुळे थंड

पंचायतीचे कर्मचारी पोलिस बंदोबस्तात इंदिरानगर चिंबल येथील बसथांब्‍याच्या ठिकाणी पोकलेन घेऊन सकाळी 9 वाजता हजर झाले. यावेळी काही गाडेधारकांनी या कारवाईस मज्जाव केला मात्र, उपस्थित असलेल्या पोलिसांपुढे त्यांचे काही चालले नाही.

काहींनी हे गाडे वाहनात घालून घेऊन गेले. ज्यांनी हे गाडे हटवले नाहीत, ते पोकलेनच्या सहाय्याने हटवण्यात आले व हे सामान पंचायतीने जप्त केले. या कारवाईनंतर तेथील परिसर मोकळा झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com