तीन मंत्र्यांना खातेवाटप, वजनदार खाती मुख्यमंत्र्यांकडेचं

महामंडळांची होणार घोषणा
Sawant gives portfolios to all three newly inducted ministers
Sawant gives portfolios to all three newly inducted ministersDainik Gomantak

पणजी : मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारानंतर वीज, गृह निर्माण खाते सुदिन ढवळीकर यांना जाहीर झाले आहे. नीळकंठ हळर्णकर यांना मच्छिमार, पशुसंवर्धन आणि कारखाने व बाष्पक, सुभाष फळदेसाई यांना समाज कल्याण, नदी परिवहन आणि पुराभीलेख खाते जाहीर झाले आहे. याशिवाय राज्यातील महत्वाच्या महामंडळांच्या अध्यक्षपदांच्या निवडीची घोषणा आज होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री (CM) कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. वजनदार मानल्या जाणाऱ्या वीज आणि समाजकल्याण खाती कुणाला मिळणार याची राज्यात सर्वांना उत्सुकता होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री स्वतःकडे महत्त्वाची अर्थात वजनदार खाती म्हणजेच गृह, अर्थ, खाण, दक्षता, शिक्षण ही ठेवणार आहेत.

Sawant gives portfolios to all three newly inducted ministers
धर्मेश सगलानी यांना सशर्त जामीन मंजूर

मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात 28 मार्च रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात विश्‍वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, नीलेश काब्राल यांचा समावेश होता. त्यांना रविवारी 3 एप्रिल रोजी खात्यांचे वाटप करण्यात आले होते. तर 9 एप्रिल रोजी आणखी 3 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यात मगोपचे (MGP) सुदिन ढवळीकर तर भाजपच्या नीळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांचा समावेश होता. या तीन मंत्र्यांना आज खाती मिळाली.

महामंडळांची घोषणा आजच !

राज्यात मंत्रिपदांबरोबरच महत्वाची अनेक महामंडळे असून त्या महामंडळांवर आमदारांची वर्णी लागणार आहे. यात पर्यटन विकास महामंडळ, आर्थिक विकास महामंडळ, (Corporation) साधनसुविधा विकास महामंडळ, कदंब महामंडळ, हस्तकला महामंडळ, आयटी महामंडळ आदींचा समावेश आहे. यावर मंत्रिपदे न मिळालेल्या भाजप (BJP) तसेच सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड, डॉ.चंद्रकांत शेट्ये, आंतोनियो वाझ आणि मगो आमदार जीत आरोलकर यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com