Fisherman Assistance Scheme: 'मुख्यमंत्री मच्छीमार मदत'साठी 'आधार' पडताळणी बंधनकारक, मत्स्यव्यवसाय खात्याकडून अधिसूचना जारी

Goa Fisherman Assistance Scheme: ‘मुख्यमंत्री मच्छीमार मदत’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना आधार क्रमांकाद्वारे ओळख पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Fisherman Assistance Scheme
Fisherman Assistance SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मत्स्यव्यवसाय खात्याच्या ‘मुख्यमंत्री मच्छीमार मदत’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना आधार क्रमांकाद्वारे ओळख पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासंदर्भातील अधिसूचना सरकारने जारी केली आहे. या योजनेत मृत मच्छीमाराच्या वारसांना ५० हजार रुपयांपर्यंतची एकरकमी आर्थिक मदत दिली जाते. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नाही, त्यांनी आधार नोंदणी करणे आवश्यक राहील.

Fisherman Assistance Scheme
Goa Rain Update: राज्यात पावसाची दमदार बॅटिंग! 2-3 दिवसांच्या मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत; रस्ते पाण्याखाली, अनेक ठिकाणी पडझड

आधार प्रमाणीकरण अयशस्वी झाल्यास ओटीपी, ऑफलाईन ई-केवायसी किंवा क्यूआर कोड पडताळणीचा पर्याय वापरण्यात येणार आहे.

अन्‍य ग्राह्य धरली जाणारी कागदपत्रे आधारकार्ड उपलब्ध होईपर्यंत निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड, पासपोर्ट, जातीचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे ग्राह्य धरली जातील. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी पडताळणीची सुविधाही उपलब्ध केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com