नरकासुराची तयारी
नरकासुराची तयारी Dainik Gomantak

दिवाळी सणावर पावसाचे सावट?

सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस पडल्यामुळे नरकासुरांवरही संकट
Published on

Bicholim, Goa: सलग दोन दिवस पडलेला पाऊस आणि हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज यामुळे ऐन दिवाळी सणावर पावसाचे सावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. कालच्या प्रमाणेच आजही सोमवारी सायंकाळी डिचोलीत बहूतेक ठिकाणी पाऊस बरसला. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे (Rain) सर्वत्र दाणादाण उडाली असून, नरकासुरांवरही (Narkasur) पावसाचे संकट ओढवले आहे.

सोमवारी सायंकाळी हवामानात गारवा निर्माण होऊन वारे सुटले. नंतर विजांचा कडकडाट (Lightning strikes) आणि ढगांच्या गडगडाटासह डिचोलीतील बहूतेक भागात पाऊस बरसला. कालच्या तुलनेत मात्र आज पावसाचा जोर कमी होता.

नरकासुराची तयारी
गोव्यातील रस्त्यांची नितीन गडकरी यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज

व्यापाऱ्यांची तारांबळ

दिवाळीच्या तोंडावर पर्जन्यवृष्टी होत असल्याने व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सायंकाळी पावसाची चाहुल लागताच दुकानदार आणि विक्रेत्यांची आकाशकंदिल झाकून ठेवण्यासाठी लगबग सुरु झाली. रस्त्याच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांवर लवकरच गाशा गुंडाळण्याची पाळी आली. काल पडलेल्या पावसावेळी नरकासुरांना सुरक्षित स्थळी हळविण्यात आले आहे. आज पुन्हा पाऊस पडल्याने बहूतेक ठिकाणी नरकासुरांची कामे अडली आहेत.

पाऊस असाच पडत राहिल्यास यंदा मोठा फटका बसणार. अशी भीती एक पारंपरिक आकाशकंदिल विक्रेता राजेश गावठणकर यांनी व्यक्त केली. आजच्या पावसामुळे तालुक्यात कोणतीही विपरीत घटना घडलेली नाही. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com