बोरी: आपली सर्व श्रेष्ठ भारतीय संस्कृती आणि परंपरा या विश्वभर प्रसिध्द असून ही परंपरा विश्वातील मानवजातीला मार्गदर्शक ठरत असून त्यानुसारच विश्वातील चांगल्या घटना घडत आहेत. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन प्रत्येकांने करून इतरांना मार्गदर्शन करायला हवे, असे प्रतिपादन कलाकार चेतना फायदे यांनी केले.
प्रागतिक विचार मंच गोवा या संस्थेने हिंदू नववर्ष गुढीपाडवानिमित्त 2 रोजी नववर्ष स्वागत समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून फायदे बोलत होत्या. या समारंभाला प्रमुख वक्ते म्हणून हिंदू नववर्ष स्वागत समिती फोंडाचे अध्यक्ष साळू भगत हे होते. तर सन्माननीय पाहुणे म्हणून गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, राया बोरकर, संस्थेचे जयवंत आडपईकर व्यासपीठावर होते.
चेतना फायदे म्हणाल्या, आपल्या थोर साधुसंतांनी अनेक मार्गदर्शक तत्त्वे आपल्यासमोर ठेवली आहेत. त्याचा वापर आता पाश्चात्य देशातील लोकही करू लागले आहेत. गुढीपाडव्याने आमचे वर्ष खऱ्या अर्थाने सुरुवात होते.साळू भगत म्हणाले, नव्या पिढीतील मुलांना आपण आपली संस्कृती आणि परंपरा शिकवून हे कार्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे द्यायला हवे. रमेश वंसकर यांचेही याप्रसंगी भाषणझाले.साळू भगत यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून नववर्ष कार्यक्रमाचे स्वागत करण्यात आले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.