पणजी: राज्यात केंद्रीय (Goa) कार्यालयांतील अधिकाऱ्यांकडून लाच मागण्याचे प्रकार घडत असल्यास त्याची माहिती जनतेने केंद्रीय अन्वेषण विभाग (SBI) गोवा शाखेच्या अधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन विभागाचे अधीक्षक आशिष कुमार यांनी आज बांबोळी येथे कार्यालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना केले. राज्यात सध्या दक्षता जागृती सप्ताह सुरू असल्याने त्यानिमित्त त्यांनी लोकांना अधिक जागरूक होण्याचे आवाहन केले.
राज्यात केंद्रीय सरकारी कार्यालये अनेक आहेत. या कार्यालयांमध्ये लोकांची काहीवेळा अधिकाऱ्यांकडून नाहक सतावणूक होते. लाच मागितलीही जाऊ शकते. मात्र त्याविरोधात आवाज उठवला जात नाही. अशा अधिकाऱ्यांची लोकांनी विभागाशी संपर्क साधून माहिती दिल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे सोपे होते. जी व्यक्ती माहिती देईल त्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्याचा तपासकामाशी काहीच संबंध असणार नाही. लोकांनी कोणतीही भीती मनात न बाळगता भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही कुमार यांनी केले.
यावेळी सीबीआय विभागाचे उपअधीक्षक टी. संतोष, उपअधीक्षक नागेश परब, टी. संतोष, पोलिस निरीक्षक अपर्णा चोपडेकर, निरीक्षक संदीप हळदणकर, निरीक्षक संजीवन नाईक, सीबीआय वकील अवनीश उपस्थित होते.
15 प्रकरणांचा तपास सुरू
सध्या सीबीआयच्या गोवा शाखेकडे 15 प्रकरणांचा तपास सुरू आहे. त्यामध्ये अधिक प्रकरणे ही भ्रष्टाचारासंबंधित आहेत. शिवाय बालिकेवरील बलात्कार व खून प्रकरणाचाही समावेश आहे. या बलात्कार प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे, मात्र संशयितांपर्यंत पोचण्यास कोणतेच धागेदोरे सीबीआय यंत्रणाही अद्याप जमा करू शकलेली नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.