Goa Cashew Plant: काजू उत्पादकांसाठी महत्वाची सूचना! कलमे घेताना सावधान; उत्तम व्यवस्थापनही गरजेचे

Goa Cashew Quality: सत्तरी तालुक्यात सध्‍या पावसाळी हंगामात काजू बागायतदार काजू लागवड करण्याच्‍या कामात व्यस्त आहेत. गावठी काजू रोपांबरोबरच विविध जातीची कलमे लावण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.
Goa Cashew Plant
Goa Cashew QualityDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सत्तरी तालुक्यात सध्‍या पावसाळी हंगामात काजू बागायतदार काजू लागवड करण्याच्‍या कामात व्यस्त आहेत. गावठी काजू रोपांबरोबरच विविध जातीची कलमे लावण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पण ही कलमे खरेदी करताना अनेक गोष्टींची चाचपणी करणे आवश्यक असते, अन्‍यथा फसवणूकही होऊ शकते. त्यातून बागायतदारांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

काजू कलमांची खरेदी करताना ती दर्जा, खात्रीशीर सरकार मान्यताप्राप्त परवानाधारक नर्सरीमधूनच खरेदी करण्याची गरज बनली आहे. तसेच लागवड केल्यानंतर रोपांची योग्य निगा, खत, पाणी, व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास चांगले उत्पन्न मिळते. पण आजही अनेक बागायतदार काजू लागवड केल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे लक्ष देत नसल्याने उत्पन्नात घट होत असल्‍याचा निष्‍कर्ष कृषी विभागाने काढला आहे.

कित्‍येकदा काजू कलमांची खरेदी करताना त्‍याकडे व्‍यवस्‍थित लक्ष दिले जात नाही. दहा वर्षांपूर्वी लागवड करण्यात आलेली कलमे समाधानकारक उत्पादन देत नाहीत.

यामुळे बागायतदारांचे कष्ट व पैसे वाया जातात. त्‍यामुळे काजू कलमे पुरविताना, खरेदी करताना सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्‍पादन घेतले जाते. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात काजू कलमांची लागवड करण्यात आलेली आहे. पूर्वी डोंगराळ भागात गावठी पद्धतीच्या काजूची लागवड करण्यात यायची. आता रानटी जनावरांचा उपद्रव वाढल्यामुळे गावठीऐवजी सपाट जमिनीत काजू कलमांची लागवड करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून काजूच्या लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. काजू क्षेत्र विस्तारित होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Goa Cashew Plant
Cashew Season: काजू बागायतदारांना मोठा फटका! काजूबिया खरेदी बंद, असंतुलित हवामानामुळे उत्पादनात घट

‘वेंगुर्ला’ कलमांना जास्‍त भाव

नगदी पीक देणारे उत्पादन म्हणून काजूची लागवड करण्यात येते. मात्र यातही फसवणूक होत असल्यास येणाऱ्या काळात कृषी क्षेत्रासमोर भयंकर समस्या निर्माण होऊ शकतात. त्‍यामुळे काजू कलमांचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर खात्याने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सध्‍या ‘वेंगुर्ला ४’, ‘वेंगुर्ला ७’ या जातीच्‍या कलमांना जास्‍त भाव दिला जात आहे.

Goa Cashew Plant
Goa Cashew Board: गोव्यात स्वतंत्र ‘काजू मंडळ’ स्थापन करणार! उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा; निर्यात क्षमतेचा घेतला आढावा

कलमांच्या लागवडीवर विशेष भर

लवकर आणि जास्‍त उत्पादन देणारे पीक म्हणून काजू कलमांची लागवड करण्यात येते. गावठी पद्धतीच्या काजूची लागवड केल्यास त्यामधून विलंबाने पीक मिळते. त्‍यामुळे काजू कलमांच्या लागवडीकडे काजू उत्पादक विशेष भर देत असतात. अशा प्रकारची लागवड अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे. कृषी खात्याच्या माध्यमातून मिळणारी काजू कलमे व खासगी नर्सरीमधून मिळणारी काजू कलमे यांचीच लागवड प्रामुख्याने करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com