Goa Carnival
Goa CarnivalDainik Gomantak

Goa Carnival: मडगावात रविवारी मिरवणूक; वाहतूक मार्गामध्ये आहेत 'असे' बदल

मडगाव नगरपालिकेत कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दक्षिण गोवा वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.
Published on

Goa Carnival: मडगावात रविवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून होली स्पिरिट चर्च ते मडगाव नगरपालिका चौकापर्यंत कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दक्षिण गोवा वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.

जुने मार्केट सर्कल ते मडगाव नगरपालिका, स्टेट बॅंक ऑफ इंडियापर्यंतचा मार्ग कुठल्याही वाहतुकीसाठी त्या काळात बंद राहील.

केवळ चित्ररथ व आपत्कालिन वाहनांना प्रवेश दिला जाईल. रेल्वे उड्डाणपुलावरून येणारी वाहने नगरपालिका इमारतीमागील सिनेलता रस्त्यावरून मडगाव रेसिडेन्सी, बीएसएनएल कार्यालय, फातिमा कॉन्व्हेंट मार्गे आबाद फारिया रस्त्यावर येतील.

बोर्डाहून मडगावात येणारी वाहने दामबाब सर्कल (फातोर्डा). युरिक सिल्वा यांच्याघराकडून वळविण्यात आली आहेत. केटीसी बस स्थानकाकडून मडगावात जाणारी वाहने जुने मार्केट सर्कल व रिंगरोड कडून वळविली जातील.

फोंडा, रायकडून येणाऱ्या प्रवासी बसेस आर्लेम जंक्शनकडून नुवे बायपास, इस्टर्न बायपास रस्त्यावरून केटीसी बसस्थानकापर्यंत जातील, तसेच केटीसी कडून फोंडा, राय, शिरोडा येथे जाणाऱ्या प्रवासी बसेस नुवे बायपास जंक्शन ते आर्लेम जंक्शनकडून पुढे जातील.

Goa Carnival
Goa Carnival : पणजीत आज कार्निव्हलची धूम; आकर्षक मुखवटे, रंगीत पताकांनी राजधानी सजली

ही वाहतुक व्यवस्था 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजल्यापासून अंमलात येईल व चित्ररथ मिरवणूक संपल्यावर वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली जाईल, असे पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

कार्निव्हल मिरवणुकीची जोरदार तयारी मडगावात सुरू असून शहरात सर्वत्र सजावटही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com