Canacona News: धक्कादायक! आईच्या भेटीसाठी मुलीची इमारतीवरून उडी! लोलये आश्रमातील घटना

वारंवार परवानगी फेटाळल्याने उचलले टोकाचे पाऊल
Girl
Girl Dainik Gomantak
Published on
Updated on

Canacona News आपल्‍याला घरच्‍या माणसांना भेटायचे आहे. त्‍यामुळे आपल्‍याला घरी जाण्‍याची परवानगी द्यावी अशी वारंवार मागणी करूनही ती प्रत्‍येकवेळी अव्‍हेरल्‍यामुळे लोलये - काणकाेण येथील बालिका आश्रमातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने पहिल्‍या मजल्‍यावरून उडी घेतल्‍याचा प्रकार काल घडला.

सुदैवाने या घटनेत त्‍या मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. असे जरी असले तरी दक्षिण गोव्‍यातील बाल कल्‍याण समितीने त्‍या मुलीला आपल्‍या आईला भेटण्‍यास का दिले नाही हा सवाल उभा ठाकला आहे. महिला व बाल कल्‍याण खात्‍याने या घटनेची गंभीर दखल घ्‍यावी, अशी मागणी होत आहे.

Girl
LIVE Goa Assembly Monsoon Session 2023 Day 14 : थेट विधानसभेच्या सभागृहातून | Goa Politics | CM

यासंबंधी काणकोण पोलिसात तक्रार नाेंद झाली असून वैतागाने आपल्‍या जिवाचे बरे वाईट करून घेण्‍यासाठी निघालेल्‍या त्‍या मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. मुलीने पहिल्‍या मजल्‍यावरून उडी घेतल्‍याचे पाहून तेथील सुरक्षा रक्षक त्‍वरित धावून आल्‍याने तिच्‍यावर तातडीने प्रथमोपचार करण्‍यात आले.

या मुलीचे पुनर्वसन करण्‍यासाठी बाल कल्‍याण समितीने लोलये येथील त्‍या आश्रमात पाठवून दिले होते. मात्र, मागचे काही महिने या मुलीने आपल्‍याला या आश्रमात रहायचे नाही. आपल्‍याला घरी जायला द्या असा तगादा लावला होता.

तिने कित्‍येकवेळा दक्षिण गोवा बाल कल्‍याण समितीच्‍या सदस्‍यांपुढे आपली ही मागणी ठेवली हाेती, पण प्रत्‍येकवेळी तिची मागणी फेटाळण्‍यात आली. त्‍यामुळेच काल तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, तिचे दैव बलवत्तर म्हणून ती सहीसलामत बचावली.

बापानेच केला होता तिच्यावर बलात्कार!

या दुर्दैवी मुलीची कहाणी अशी की, वर्षभरापूर्वी तिच्‍यावर तिच्‍या वडिलांनीच बलात्‍कार केला होता. या घटनेमुळे रागावलेल्या त्‍या मुलीने स्‍वत:च पोलिसात जाऊन आपल्‍या वडिलाविरुद्ध तक्रार दिली. त्‍यानंतर त्‍या नराधम बापाला अटकही करण्‍यात आली.

सध्‍या तो तुरुंगात आहे. सुरवातीला त्‍या मुलीला ‘अपना घर’मध्‍ये ठेवण्‍यात आली होते. त्यानंतर तिची रवानगी बालिका आश्रमात केली होती. त्‍या मुलीची आई तिच्‍या मूळ घरी राहते.

Girl
Goa Kala Academy: कला अकादमी खुली करण्यासंदर्भात गोविंद गावडेंची महत्वाची माहिती; म्हणाले निश्चित तारीख...

बाल कल्‍याण समितीकडे दोषाचे बोट : वास्‍तविक बाल पुनर्वसन कायद्याप्रमाणे अशाप्रकारच्‍या वंचित मुलांना त्‍यांच्‍या पालकांकडे पोचविणे बंधनकारक आहे. त्‍यासाठी बाल कल्याण समितीने प्रयत्‍न करण्‍याची गरज आहे.

या मुलीचे पालक कोण याची माहिती बाल कल्‍याण समितीच्‍या सदस्‍यांना होती. असे असतानाही तिला तिच्‍या आईला भेटायला का दिले नाही हा प्रश्न उपस्‍थित होत असून यासंदर्भात सरकारच्‍या महिला व बाल कल्‍याण खात्‍याने सखोल चौकशी करण्‍याची मागणी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com