Car Stunt On Calangute Road: थारला लटकत पर्यटकांची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

Car Stunt On Calangute Road: अवघ्या तीन दिवसांपूर्वी बेदरकारपणे कार चालवणाऱ्या महाराष्ट्रामधील तिघा पर्यटकांना ओल्ड गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
Car Stunt On Calangute Road
Car Stunt On Calangute RoadDainik Gomantak

Car Stunt On Calangute Road: गोव्यात बेदरकारपणे आणि वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे बऱ्याच घटनांमधून समोर आलंय.

अवघ्या तीन दिवसांपूर्वी बेदरकारपणे कार चालवणाऱ्या महाराष्ट्रामधील तिघा पर्यटकांना ओल्ड गोवा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती आणि आता पुन्हा अशाच प्रकारची घटना कळंगुट नायकवाडो येथे घडली.

Car Stunt On Calangute Road
Goa Students Eye Defects: राज्यातील 8 टक्के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष; सरकारी तपासणीतून समोर आली बाब

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कळंगुट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी पीएसआय राजाराम बागकर आणि हेड कॉन्स्टेबल केशव नाईक यांच्यासह घटनेची सविस्तर माहिती घेत वाहन चालक आणि वाहन मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

या घटनेसंबंधी मिळालेल्या माहिती नुसार मुंबईहून गोव्यात आलेल्या पर्यटकांनी रेंटवर घेतलेल्या महिंद्रा थार (गाडी क्र. GA03AH4666) मधून सोमवारी सकाळी नायकवडो, कळंगुट भागात धोकादायकपणे वाहन चालवत स्टंट करण्याचा प्रकार सुरु केला.

या घटनेचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत काही तरुणी आणि तरुण गाडीला लटकत प्रवास करत असल्याचे दिसत होते.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सदर वाहनाचा मालक व चालक यांचा शोध घेऊन मोटार वाहन कायद्याच्या 184 अन्वये गुन्हा दाखल केलाय.

तसेच कार चालकाला न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजार करण्यात आले यावेळी न्यायालयाने चालकावर 5,000/- दंड ठोठावलाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com