Kadamba Transport Corporation: आता कदंब बस चालकांची तपासणी होणार; 'KTC' प्रमुख बसस्थानकावर अल्कोमीटर बसवणार

Kadamba Transport Corporation: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना या मोहिमेद्वारे चाप बसणार आहे.
Kadamba Transport Corporation
Kadamba Transport CorporationDainik Gomantak
Published on
Updated on

Kadamba Transport Corporation काही दिवसांपूर्वी कदंब बस चालकाने दारूच्या नशेत बस चालवली होती. त्या प्रकारानंतर जुने गोवा पोलिसांनी एल्विस रॉड्रिग्स या बस चालकावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

तसेच सदर चालकाला निलंबित करून त्याचा परवानाही रद्द केल्याची माहिती समोर आली होती. याच धर्तीवर आता कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने महत्वाचं पाऊल उचललं असून राज्यातील प्रमुख बसस्थानकावर अल्कोमीटर ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Kadamba Transport Corporation
Water Shortage In Sattari: ऐन दिवाळीत सत्तरीत पाणी टंचाई; टँकर सेवाही पडतेय अपुरी

मद्यपान करून वाहन चालविण्याच्या घटना रोखण्यासाठी 'कदंब ट्रान्सपोर्ट' कडून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे केटीसीचे जीएम संजय घाटे यांनी सांगितले आहे. बस स्थानकातून निघतेवेळी प्रवाशांना किंवा बस नियंत्रकाला आवश्यक वाटल्यास ते अल्कोमीटरद्वारा बस ड्रायव्हरची तपासणी करुन त्याला रोखू शकतात.

प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना या मोहिमेद्वारे चाप बसणार असून ही योजना कधीपासून कार्यान्वयीत होणार याचीही माहिती समजू शकली नाही.

Kadamba Transport Corporation
विस्ताराच्या विमानाला दाबोळीवर लँडिंगची परवानगी का नाकारली? फ्लाईट केम्पेगौडाला वळवली

प्रमुख बसस्थानकावर अल्कोमीटर ठेवण्यात आल्याने प्रवाशांना किंवा बस नियंत्रकाला बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वाटत असल्यास ते तातडीनं रोखू शकतात. परिणामी मद्यपान करून वाहन चालविण्याच्या घटना रोखण्यासाठी हे महत्वाचे पावले उचलल्याचे सांगितले जातेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com