Goa Assembly 2025: महिलांसाठी सरकार तत्पर! खास महिलांसाठी LIC विमा सखी योजना; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa Assembly Session March 2025: जाणून घ्या गोव्यातील ठळक बातम्या, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa Assembly 2025: महिलांसाठी सरकार तत्पर, महिलांसाठी खास LIC विमा सखी योजना; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी
CM Pramod SawantS Social Media
Published on
Updated on

Goa Government Scheme: महिलांसाठी सरकार तत्पर; महिलांसाठी खास LIC विमा सखी योजना

महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विमा सखी योजना सुरु करण्यात आलीये.

Goa Assembly Session Live Updates: माजी बसची कदंबला मदत; गोवेकरांसाठी प्रवास सोयीस्कर

आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी सरकारचा पक्ष मांडताना माजी बस सेवा, अपघातग्रस्तांना मदत, कदंब बसची जागोजागी दिली जाणारी सेवा याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Goa News Updates: हर घर नल... कुठे आहे जल?

गोव्यात पाण्याची कमतरता आणि अनियमित पुरवठ्याकडे लक्ष वेधत अ‍ॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

Goa Political News: गोव्यात रहात असलेल्या बिहारगोमंतकीयांची जनगणना करा! आमदार प्रेमेंद्र शेट यांची मागणी

गोव्यात रहात असलेल्या बिहारगोमंतकीयांची जनगणना करण्याची गरज आहे. काही बिगर गोमंतकीय अवैध्य रित्या किंवा खोटे ओळखपत्र करून राहतात आणि गोव्यात रोजगार करतात ज्यामुळे मूळ गोमंतकीयांना रोजगार मिळण्यात अडचण होते. त्यामुळे अशा बिगरगोमंतकीयांची चौकशी करण्याची मागणी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सभागृहात केली.

Michael Lobo: "एक्सपोजीशन समारंभाला विरोधी नेते नावं ठेवूच शकत नाही" मायकल लोबो

"एक्सपोजीशन समारंभाला विरोधी नेते नावं ठेवूच नाही शकत". गोवा सरकारकडून स्थानिक, देशी तसेच विदेशी भाविकांसाठी उत्तम सेवा पुरवल्या गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोव्यासाठी भरपूर मोठं योगदान दिलं आहे. असं म्हणत मायकल लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं.

Goa Water Shortage Issue: एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची कमतरता भासणार नाही, CM सावंत

मे 2026 पर्यंत आम्ही गोमंतकीयांना अतिरिक्त 248 एमएलडी पाणी पुरवणार असून एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याची कमतरता भासणार नाही, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी सरदेसाईंच्या प्रश्नावर दिले.

Goa Water Shortage Issue: 'गोव्याला 672 MLD पिण्याची पाण्याची गरज, पण...'; सरदेसाईंनी पाण्याच्या तुटवड्यावर मांडला लेखाजोखा

संपूर्ण गोव्याला 672 MLD पिण्याची पाण्याची गरज असून पैकी 595 MLD पाणी PWD कडून गोव्यातील जनतेला पुरवले जाते. एकूण 91 MLD पिण्याच्या पाण्याचा तुटवडा गोव्याला जाणवतो ज्याची टक्केवारी 13 टक्के आहे, अशी विजय सरदेसाई यांची विधानसभेत माहिती.

Vishwajeet Rane: ...पुन्हा राज्यात भाजपचेच सरकार येणार; मंत्री राणेंचा आलेमाव यांना टोला

सरकामध्ये अर्धे लोक तुमचेच असून पुढच्यावेळीही राज्यात भाजपचेच सरकार येणार आणि ते आणण्यासाठी तु्म्हीच मदत करणार असा टोमणा मंत्री विश्वजीत राणे यांनी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांना मारला

Vishwajeet Rane: "बाणावलीचा तुझा प्रश्न बघून घेईन मी" मंत्री विश्वजित राणे

सर्व ठिकाणी एकाच वेळी लक्ष देणं शक्य नाही, पण सरकारचं काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सुविधा दिल्या जाण्याचं काम सुरु असल्याचं मंत्री विश्वजित राणे म्हणाले.

Vijai Sardesai: अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ कधी देणार? सरदेसाई आक्रमक

बाकी राज्यांच्या तुलनेत अंगणवाडीत काम गेल्या २० वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाकी राज्यांच्या तुलनेत कमी पगार दिला जातोय, यांना कधी पगारवाढ देणार असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला.

CM Pramod Sawant: ओबीसीच्या जनगणनेवर मुख्यमंत्री म्हणाले "नोटेड"

गोवा फॉरवर्डचे पक्षनेते विजयी सरदेसाई यांनी जातीची गणना करण्याची मागणी केलीये. बहुजन समाज त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांपासून वंचित आहे. मला सरकारकडून खात्री हवी आहे असा जोर त्यांनी धरला मुख्यमंत्री ‘नोटेड’ असे उत्तर दिले, परंतु कोणतीही ठोस खात्री दिलेली नाही.

Goa Budget 2025 Live Updates: जुने गोवे वारसा स्थळाबाबत मंत्री विश्वजित राणे यांची माहिती

जुने गोवे वारसा स्थळाबाबत टीसीपी मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की जर आवश्यक परवानग्या आणि मार्गदर्शक तत्त्वांसह विकास कामे केली जात असतील तर त्यात काही अडचण नाही.जर उल्लंघन झाले तर 24 तासात कारवाई केली जाईल. त्यांनी टीसीपी विभागाकडून चालू कामाचा अहवाल मागवला आहे.

Goa Budget 2025: करमळी येथे जास्ती रेल्वे थांबण्यासाठी नेवरा क्रॉसिंग रेल्वे स्थानकाची गरज: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

नेवरा येथे रेल्वेस्थानक नको असे पत्र करण्यापेक्षा करमळी रेल्वेस्थानकावर जास्ती रेल्वे थांबण्यासाठी आधी पत्र देणे अपेक्षित होते. तसेच करमळी येथे जास्ती रेल्वे थांबण्यासाठी नेवरा क्रॉसिंग रेल्वे स्थानकाची अत्यंत गरज आहे. – मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

Goa Budget 2025: "तो माकां विचारतालो ट्रेन किद्याक लेट जाली?"

नवीन रेल्वे प्रकल्पांवरून मंत्री माविन गुदिन्हो आणि रेव्होल्यूशनरी गोवन पक्षाचे विरेश बोरकर आमनेसामने.

Goa Budget 2025: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात (Watch Goa Budget Session Live)

Goa Budget 2025: विधानसभेतील स्क्रीन बदलली!

Goa Budget 2025: विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांचे अधिवेशन आणि मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतचे निवेदन

Goa Accident: आठवडा ठरला दुःखद; कोलवाळ येथे अपघातात 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

कळंगुट येथील चार अल्पवयीन मुले दोन बुलेट मोटारसायकलींवर आठवड्याच्या शेवटी आमठाणे धरणावर गेली होती. परत येत असताना तरुण राणे यांचा कोलवाळ हद्दीजवळ आत्मघातकी अपघात झाला. त्यांच्या मागे बसलेल्या चालकाला दुखापत झाली. दोघांनाही वैद्यकीय मदतीसाठी आझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com