
फोंडा पोलीस व फोंडा गुन्हा अन्वेक्षण विभागतर्फे एक पेड माँ के नाम अंतर्गत झाडे लावण्यात आली. तसेच झाडे लावलेल्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी साफ सफाई केली.
या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्याच ठिकाणी येऊन माफी मागावी अशी मागणी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या कुठलाही सरकारी अधिकारी अशा प्रकारची मागणी करू शकत नाही. तसेच आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांच्या आधारे माफी मागितली असून त्याची एक प्रत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दिली जाईल अशी अपेक्षा असल्याची माहिती डॉ. मधु घोडकिरेकर यांनी दिली आहे.
डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी त्या जागेवर येऊन नव्हे तर ज्या खुर्चीचा अपमान झाला त्या खुर्चीला किंबहुना त्या पदाची माफी मागणं महत्वाचं होतं, डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय असं डॉ. मधु घोडकिरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्री, जीएआरडी, जीएमसी डीन आणि जीएमसी प्राध्यापकांमध्ये झालेल्या बैठकीनंतर जनहितासाठी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिचोली आरोग्य केंद्रात प्रसारमाध्यमांच्या प्रवेशावर बंदी घालणारा बोर्ड आता काढून टाकण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या पणजी कार्यालयात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांची पत्रकार परिषद. मंत्र्यांची वादग्रस्त विधाने आणि कृती याबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना दोघांनीही उत्तर देणे टाळले.
डिचोली आरोग्य केंद्रात लावलेल्या 'माध्यम व्यक्तींना प्रवेश बंदी' अशा फलकाचा गोवा पत्रकार संघाकडून निषेध व्यक्त केला जातोय.
साखळी शहरात परंपरेप्रमाणे सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. आपल्या सत्यवानाच्या दिर्घायुष्यासाठी ईश्वराकडे व वडाच्या झाडाची पुजा करत सौभाग्याचा धागा गुंफला
डॉ. रुद्रेश आणि जीएआरडी डॉक्टरांनी मंत्री विश्वजित राणे यांच्याकडून माफी मागण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता आणि संपाची योजना जाहीर केली होती, तरीही जीएमसी आज सुरळीतपणे काम करत आहे.
मानसवाडा - कुंडई येथे अज्ञात चोरट्यांनी घरात मागील दरवाजातून प्रवेश करून अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचे दागिने केले लंपास. म्हार्दोळ पोलिसांकडून सोमवारी रात्री उशिरा अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद.
डिचोलीत गावोगावी वटपौर्णिमेचा उत्साह. पावसाने उसंत घेतल्याने व्रताचा उत्साह द्विगुणित. पारंपरीक वडाची पूजा करून सुवासिनींनी मनातील इच्छा प्रकट करून वडासभोवताली मारले सात फेरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.