
केरळ येथील २२ वर्षीय साहील या युवकाचे अवयवदान. २०२५ मध्ये हे तिसरे अवयवदान; तिघांच्या अवयवदानामुळे एकूण ११ जणांना मिळाले नवजीवन : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर.
गोव्यातील आयआयटी प्रकल्पाची पायाभरणी यंदाच्यावर्षी केली जाईल, यासाठी लागणाऱ्या पैशांची जमवाजमव झालीये आणि लवकरच जागा ठरवली जाईल.
हातुर्ली श्रीसुशेन दत्त मठात महिलांतर्फे 'विश्वशांती यज्ञ'. श्रीमत सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामीजी पुण्यतिथी आणि रथसप्तमीनिमित्त आयोजन.
गोव्याला कोकण रेल्वेद्वारे मये, नेवरा आणि सरझोरा येथे तीन नवीन रेल्वे स्थानके तयार करून दिली जाणार आहेत. भविष्यात लोकांना राज्यात प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करता येणार असल्याने ही महत्त्वाची भूमिका ठरेल : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
तिराळ उसगाव भागात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने व गव्यानी लोक वस्तीत प्रवेश करून धुमाकूळ घातला आहे. तिराळ -उसगाव येथे ४-५ दिवसापूर्वी अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याला स्कूटरची धडक बसून आई व मुलगा जखमी होण्याची घटना घडली होती. तर गेल्या २-३ दिवसापासून परिसरात बिबट्याने भरदिवसात पाळीव कुत्र्यांची शिकार करण्यात सुरुवात केली आहे. वन खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिक लोक करीत आहे.
सीसीपीने पणजीत मान्सूनपूर्व गटार सफाईचे काम सुरू केले आहे. एकूण ३० वॉर्डांपैकी अंदाजे ११ वॉर्डांची आतापर्यंत स्वच्छता करण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीचे काम करताना पाईप्स खराब झाले आहेत हे मी मान्य करतो पण ते दुरुस्त करण्यासाठी आमचे काम सुरु होते. ३१ मार्चपर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होतील:सीईओ संजित रॉड्रिग्ज
रोमी कोकणीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी करत ग्लोबल कोकणी फोरमने आझाद मैदानावर निदर्शने केली. रोमी कोकणीला देवनागरी सारखा अधिकृत दर्जा न मिळाल्यास ते न्यायालयात न्याय मागतील असेही म्हणाले आहेत.
एएनसीने व्हागतोर येथे भाड्याने घेतलेल्या जागेवर टाकलेल्या छाप्यात, जर्मन येथील सेबॅस्टियन हेस्लर (४५) याला २४ लाख रुपयांच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली. ज्यामध्ये एलएसडी ब्लॉट पेपर्स, केटामाइन पावडर, केटामाइन लिक्विड आणि २ किलो गांजा यांचा समावेश आहे.
'वेदांता'ची खनिज वाहतूक सुरु. तब्बल आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर डिचोली खाणीवरून खनिज ट्रकांची धडधड. ट्रकमालकांच्या मागण्या मान्य.
गोव्यातील जनतेला कोकणी राज्यभाषा दिवसाच्या शुभेच्छा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.