बारावीचे निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता; गोवा बोर्डाने दिली माहिती

Goa Board Exam Results : बारावीचा निकाल या आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण निकालाची तारीख अजून ठरलेली नाही, असे गोवा बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
Goa Board Exam Results
Goa Board Exam Results Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Board Exam Results : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल या आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे, असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही परीक्षा गेल्या महिन्यात 5 एप्रिलपासून पद्धतीने घेण्यात आली होती. (Goa Board Exam Results)

Goa Board Exam Results
अनियमित मासिक पाळीच्या समस्येपासून होईल सुटका; करा ही 4 योगासने

बारावीच्या परीक्षेत 18,215 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,937 मुले आणि 9,278 मुली होत्या. बारावीचा निकाल या आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण निकालाची तारीख अजून ठरलेली नाही, असे गोवा बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

गोव्यातील 106 उच्च माध्यमिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये वाणिज्य शाखेसाठी 5,502 विद्यार्थ्यांनी, विज्ञान शाखेसाठी 5,080, कला शाखेसाठी 4,757 आणि व्यावसायिक शाखेसाठी (Vocational Education) 2,876 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

गोवा बोर्डाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी विशेष मूल्यमापन योजना सुरू केल्यानंतर जाहीर होणारा हा पहिला निकाल असेल, जो आता पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत वाढवण्यात आला आहे. योजनेनुसार, शैक्षणिक वर्ष दोन टर्ममध्ये विभागले गेले आहे; पहिली नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि दुसरी एप्रिल-मे मध्ये असणार आहे.

पहिली टर्मिनल परीक्षा डिसेंबर/जानेवारीमध्ये 50% शैक्षणिक भागासाठी घेण्यात आली होती आणि परीक्षा बहु-निवडक प्रश्नांच्या (Multiple Choice Questions) स्वरूपात होती. दुसरी टर्मिनल परीक्षा उर्वरित 50% भागांसाठी घेण्यात आली आणि ही परीक्षा व्यक्तिनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात (Subjective Questions) आहे.

अंतिम निकालासाठी, दोन्ही टर्म परीक्षांचे गुण, प्रकल्प कार्य, असाइनमेंट आणि अंतर्गत गुण जोडले जातील. ही योजना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आवश्यकतांशी सुसंगत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com