दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून सुरू: गोवा बोर्ड

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार असल्याचे, असे गोवा बोर्डाने जाहीर केले आहे.
Goa Board: Practical Exam
Goa Board: Practical ExamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Board: गोव्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार असल्याचे, असे गोवा बोर्डाने जाहीर केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 18 मार्च रोजी संपणार असून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 25 मार्च रोजी प्रात्यक्षिक पूर्ण होतील, या परीक्षांचे नियोजन शाळांना करण्यात आले आहे.

बोर्डाच्या (Goa Board) परिपत्रकात असे नमूद केले आहे की विद्यार्थ्यांना शाळांद्वारे गटांमध्ये विभागले जाईल. त्याचबरोबर प्रॅक्टिकल आयोजित करताना सर्व कोविड-संबंधित आरोग्य प्रोटोकॉल संस्थांतर्फे पाळले जातील. शाळेचे प्रमुख प्रात्यक्षिक परीक्षेसाठी परीक्षेची तारीख आणि बॅचची संख्या शाळांना बोर्डाद्वारे कळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर परिसरातील शाळांमधून प्रात्यक्षिकांसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शाळेच्या प्रमुखांनी संबंधित शाळांच्या प्रमुखांशी सल्लामसलत करून शेजारच्या शाळांमधून बाह्य परीक्षकांची नियुक्ती करावी आणि परीक्षेची तारीख आणि त्यांची संख्या यासह मंडळाच्या कार्यालयाला कळवावे, असे बोर्डाने जाहीर केले आहे. (Goa Board announces schedule for 10th and 12th practical examinations)

Goa Board: Practical Exam
कोलव्यात विवाहित महिलेनं घेतला गळफास

विद्यार्थ्यांना लागणारे प्रॅक्टिकलचे साहित्य 24 फेब्रुवारी 2022 पूर्वी शाळांना बोर्डातर्फे पाठवले जाणार आहे. उत्तरपुस्तिका आणि इतर तपशील सीलबंद केले जातील आणि शाळेच्या मुख्यांकडे सुपूर्द केले जातील. जे आवश्यक असल्यास भविष्यातील पत्रव्यवहारासाठी सुरक्षित कोठडीत ठेवण्यात येणार असल्याचे शाळांना दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.

कोविड-19 (Covid) साथीच्या आजारामुळे, गोवा बोर्डाने आताच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी केवळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित मूल्यमापन धोरण लागू केले आहे. धोरणानुसार, अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक आणि प्रकल्पाची कामे शाळांनी काटेकोरपणे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com