Goa BJP: भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु

Goa BJP: भाजप ऐतिहासिक विजय मिळविणार असा विश्वास केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला.
Goa BJP | Rajeev Chandrasekhar
Goa BJP | Rajeev ChandrasekharDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP: देशात भाजपचा विजयी ग्राफ वाढतच आहे. 2024 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजय मिळविणार असा विश्वास केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बार्से येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष खुशाली वेळीप, सरपंच अर्जुन वेळीप, महेश फळदेसाई, दामू नाईक, सर्वानंद भगत, तुळशीदास नाईक, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, संजना वेळीप आदी उपस्थित होते.

Goa BJP | Rajeev Chandrasekhar
Petrol-Diesel Price In Goa: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले, की केपे मतदारसंघातील मतदारांनी विधानसभेत जी चूक केली त्याचा पश्चात्ताप आता मतदारांना व्हायला लागला आहे. केपेकर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या चुकीची दुरुस्ती करतील अशी आपल्याला खात्री आहे.

केपेत भाजपचा आमदार नसला, तरी लोकसभेत सर्वाधिक मताधिक्य केपे मतदारसंघात मिळणार असल्याची आपल्याला खात्री आहे. गेली लोकसभा आम्ही हरलो. कारण भाजपबरोबर बाबू, रवी नाईक व इतर भाजप समर्थक आमदार नव्हते.

आज भाजप बरोबर संपूर्ण गोव्याची जनता असून जनतेच्या बळावर भाजप गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार आहे. यावेळी खासदार विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, दामू नाईक, खुशाली वेळीप यांनीही आपले विचार मांडले.

‘स्टार्टअपला गोव्यात वाव’

गोव्यात स्टार्टअपसाठी प्रचंड वाव आहे, असे मत केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. चंद्रशेखर म्हणाले की, आम्ही गोव्यात स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी एक मजबूत तंत्रज्ञान इको सिस्टीम तयार करण्यासाठी अतिशय सक्रि यपणे काम करत आहोत.

‘भाजपच देऊ शकतो सर्व सुविधा’

देशातील युवकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी देशात ‘स्टार्ट अप’ कार्यक्रमांतर्गत सामान्यातला सामान्य युवकही सरकारच्या सहयोगाने स्वयंपूर्ण होत आहे व इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्यास यशस्वी ठरले आहे.

युवकांना रोजगार, जनतेला आरोग्य, प्रत्येकाला अन्न, वस्त्र व निवारा देणे हे भाजपच करू शकतो. भाजप येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा जिंकणार आहे, असा विश्वास केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com