Goa News: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यालयात चोरी; दोघेजण ताब्यात

Goa Theft Case: विविध माध्यमांचा वापर करून पोलिसांनी मंगळवार, १३ मे रोजी रात्री उशिरा दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: गोव्यात घडणारे चोरीचे प्रकार हे आता सर्रास झालेले आहेत. चोरट्यांकडून कोणत्या वास्तू लक्ष्य बनविल्या जाणार ते सांगता येत नाही. साखळी शहरात चोरट्यांनी चक्क भाजप कार्यालयच लक्ष्य बनविले असून आतील दोन मोबाईल फोन लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.

डिचोली पोलिसांनी या चोरीप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हा चोरीचा प्रकार शनिवार, ९ मे रोजी घडला होता. रात्रीच्या वेळी भाजप कार्यालयाचे पुढील दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व आत ठेवलेले कार्यालयातील दोन मोबाईल लंपास केले.

या प्रकरणाची माहिती डिचोली पोलिस स्थानकाला मिळताच पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. विविध माध्यमांचा वापर करून पोलिसांनी मंगळवार, १३ मे रोजी रात्री उशिरा दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची तसेच या प्रकरणाची चौकशी पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Goa CM Pramod Sawant
Goa Crime: गोव्यात सत्ताधारी भाजपच्या कार्यालयात चोरी; राज्यात कायदा-सुव्यवस्था कोसळल्याचा काँग्रेसचा आरोप

विजय सरदेसाई यांचा चिमटा

"साखळी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या चोरीबद्दल फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्मार्ट चोरांनी केलेली ही स्मार्ट चोरी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात चोरसुद्धा स्मार्ट झाले आहेत. त्यांना नेमके कुठल्या पक्षाकडे जास्त पैसे आहेत हे माहीत आहे."

"शिवाय पोलिस या चोरीप्रकरणी काहीच करणार नाहीत याची जाणीवही या चोरांना आहे. एका महिन्यापूर्वी करंझाळे येथील धेपे यांच्या बंगल्यात चोरी झाली. अजून त्या चोरांचा तपास लागलेला नाही. शिवाय या चोरीप्रकरणी कोणालाही जबाबदार धरण्यात आलेले नाही", असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Goa CM Pramod Sawant
South Goa: वेर्णा येथे पाईपलाईनला गळती; दक्षिण गोव्यात मर्यादीत पाणी पुरवठा

राज्यात कायदा-सुव्यवस्था कोसळल्याचा काँग्रेसचा आरोप

"साखळी येथील भाजप कार्यालयात घडलेली चोरी हीच राज्यातील पोलिस यंत्रणेचे अपयश दर्शवते. ही जबाबदारी गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरच आहे. या चोरीच्या घटनेने स्पष्ट होते की गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे", गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com