Goa Trinamool Congress: भाजपकडून फक्त सूडाचे राजकारण- समिल वळवईकर

Goa Trinamool Congress: गोवा सरकारला जाब प्रश्‍न करणाऱ्यांना अटक करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.
Trinamool Congress
Trinamool CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Trinamool Congress: भाजपकडून केंद्रात आणि गोव्यात सूडाचे राजकारण केले जात असून सरकारला प्रश्‍न करणाऱ्यांना अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना देखील अशाच प्रकारे गुजरात पोलिसांनी दोनवेळा अटक केली होती. हा विरोधी आवाजावरच नाही, तर लोकशाहीवर हल्ला आहे, अशी टीका गोवा तृणमूल काँग्रेसचे संयुक्त संयोजक समिल वळवईकर यांनी केली.

पणजी येथे घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो आणि पक्षाचे आयटी समन्वयक तनोज अडवलपालकर उपस्थित होते. जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे, परंतु गेल्या आठ वर्षांत आपल्या लोकशाहीला भाजपकडून निरंतर हानी पोहोचवली जात आहे.

Trinamool Congress
Goa BJP: दक्षिणेत भावी खासदाराच्या चर्चेला रंग! 'खरी कुजबूज'

लोकशाही नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांची असंख्य उदाहरणे आहेत. जेव्हा जेव्हा विरोधक खासकरून तृणमूल काँग्रेस सत्ताधारी कारभाराविरोधात आवाज उठवते, तेव्हा भाजप सरकार आमच्या नेत्यांचा आवाज दाबून त्यांना त्रास देते, असा आरोप वळवईकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Congress Merger Proposal
Goa Assembly Election
Ganeshotsav Noise pollution Goa
Nepal Flood
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com