Goa Lokotsav 2022: गोव्यात भाजप सरकार येण्यामागे आदिवासीचे आंदोलन कारणीभूत- फगनसिंग कुलास्ते

Goa Lokotsav 2022: लोकोत्सवाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीयमंत्री फगनसिंग कुलास्ते यांची खास उपस्थिती..
Goa Lokotsav 2022 | Faggan Singh Kulaste
Goa Lokotsav 2022 | Faggan Singh KulasteDainik Gomantak

Goa Lokotsav 2022: भाजपचे सरकार गोव्यात येण्यास आदिवासीचे आंदोलन कारणीभूत ठरले आहे. त्यासाठी आदिवासीच्या दोन युवकांना हुतात्मा व्हावे लागले. त्यावेळी राष्ट्रीय आदिवासी नेत्यांनी राज्यात गोवा आदिवासी नेत्याच्या सहकार्याने आंदोलन उभारले होत, असे केंद्रीयमंत्री फगनसिंग कुलास्ते यांनी काल लोकोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले.

महिलांना सक्षम करण्यासाठी 2 कोटी 34 लाख स्वंय सहाय्य गटाद्वारे 9 कोटी महिलांना लाभ देण्यात येत आहे. या गटातील महिलांना प्रती एक लाख रुपये लाभ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये अद्यापही सरकार पाहिजे, त्या प्रमाणात अर्थसाहाय्य करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकोत्सवातून लोकसंस्कृती, लोकवेद संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामागे सभापती रमेश तवडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचे भरीव योगदान आहे, असेही कुलास्ते म्हणाले.

Goa Lokotsav 2022 | Faggan Singh Kulaste
Goa Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच, गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

यावेळी कर्नाटकचे माजी आमदार सुनील हेगडे, आदिवासी जाती जमातीच्या आयोगाचे कमिशनर दीपक करमरकर, दक्षिण गोवा महिला मोर्चाच्या अध्यक्ष मनुजा नाईक गावकर, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, श्रीस्थळच्या सरपंच सेजल गावकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, पंच राजेश वेळीप, प्रशांत वेळीप, शिल्पा प्रभूगावकर, उपसरपंच सुनील पैंगणकर, शिवा देशमुख, चंद्रकांत सुदीर, बलराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर, खजिनदार गणेश वेळीप व अन्य उपस्थित होते.

मॉडेल तालुक्यासाठी प्रयत्न

कार्यकर्त्याची इच्छा, अपेक्षांची भूक भागविणे, हे नेत्याचे काम असते. त्याच भावनेतून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात येते. जनतेने पाच वर्षे म्हणजे साठ महिने आपल्यासाठी काम करण्याची संधी मला दिली आहे. त्यापैकी दहा महिने गेले आहेत, त्याचा लेखाजोखा देण्याचे दायित्व असल्याचे त्यांनी सांगितले.

काणकोणात उभारण्यात येणाऱ्या फूड पार्कसाठी 60 कोटी रूपयांचा निधी देण्याचे आश्वासन ट्रायफेडचे उपाध्यक्ष रामसिंग राठवा यांनी दिले आहे. काणकोण तालुका देशांत एक मॉडेल तालुका बनविण्याचे आपले ध्येय आहे, असे तवडकर यांनी सांगितले.

Goa Lokotsav 2022 | Faggan Singh Kulaste
Goa Rain Update: गोव्यात अवकाळी पाऊसामुळे नागरिकांची धांदल; पिकांना धोका शक्य

एलन प्रशिक्षण संस्था उभारणार

काणकोणात एलन शैक्षणिक संस्थेतर्फे लवकरच प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे. राजस्थान येथे एलन शैक्षणिक संस्थेतर्फे हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. या संस्थेतर्फे देशाच्या वेगवेगळ्या भागात आदिवासी मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आआयआयटी, आयएएस अधिकारी झाल्यानंतर त्या गावचा विकास होत असल्याचे एलन शैक्षणिक संस्थेचे संचालक नवीन महेश्वरी यांनी सांगितले.

काणकोणात लवकरच फूड पार्क

ट्रायफेडतर्फे देशात पाच फूड पार्क उभारण्यात येणार येणार आहेत. त्यापैकी एक फूड पार्क काणकोणात उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी कायद्याच्या अडचणीवर तोडगा काढण्यात येणार आहेत, असे ट्रायफेडचे उपाध्यक्ष रामसिंग राठवा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सभापती तवडकर यांचे आदिवासी समाजासाठीचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याच्या ज्ञानाचा उपयोग गुजरातमधील आदिवासी कल्याणासाठी उपयोगी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com