Goa BJP  पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे
Goa BJP पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे Dainik Gomantak

भाजप सरकारने राबवलेल्‍या लक्ष्मी व अन्य विकास योजना यशस्‍वी..!

आता अनेक पक्ष अनेक घोषणा करणार आणि निवडणुकीनंतर गायब होणार. त्‍यांच्‍यावर विश्‍‍वास ठेवू नका. आमदार दयानंद सोपटे यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा..
Published on

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रेरणेतून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी गृहआधार, लाडली लक्ष्मी व अन्य विकास योजना भाजप (Goa BJP) सरकारने राबवल्‍या आणि त्‍या यशस्‍वी राबविल्‍याही. आता अनेक पक्ष अनेक घोषणा करणार आणि निवडणुकीनंतर गायब होणार. त्‍यांच्‍यावर विश्‍‍वास ठेवू नका. आमदार दयानंद सोपटे (Dayanad Spote) यांच्या मागे खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन आरोग्‍य व महिला-बालकल्याण विकासमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी केले.

Goa BJP  पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे
सरकारचा नोकर भरती घोटाळा,मोन्सेरात यांचा पक्षाला घरचा आहेर तर आपनेही घेरले

मांद्रे मतदारसंघात सेल्फ हेल्प ग्रुप व महिला मंडळांना स्वावलंबन योजनेची मंजुरीपत्रे वितरित केल्‍यानंतर प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. दीनदयाळ सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, महिला बालकल्याण खात्याच्या संचालक ज्योती देसाई, पेडणेच्या अधिकारी प्रमिला मळीक, राज्य पदाधिकारी सपना मापारी, मांद्रे महिला मोर्चा अध्यक्षा दीपा तळकर, नयनी शेटगांवकर, तारा हडफडकर, भाजप उपाध्यक्ष गीता कदम, मांद्रे भाजप मंडल अध्यक्ष मधू परब, सरचिटणीस सुदेश सावंत, दीपश्री सोपटे, कुंदा चोडणकर आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

महिला मंडळांना भेडसावणारी समस्या म्हणजे नूतनीकरण व ऑडिट रिपोर्ट. परंतु ही योजना सुटसुटीत केली असून फक्त पैसे खर्च केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे बंधनकारक करण्‍यात आले असून. वर्षाला 60 हजार रुपये देण्याची योजना विचाराधीन असल्याचे राणे यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल केल्याने लोकांना मुंबई, कर्नाटकात आता जावे लागत नाही. 250 कोटींचे सुपर स्पेशालिटी इस्पितळ लवकरच सेवेत उपलब्ध होईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com