Goa BJP: मुख्‍यमंत्र्यांनी तानावडेंसह घेतली नरेंद्र मोदी, शहा, नड्डा यांची भेट

भेटीदरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीची चर्चा
Narendra Modi
Narendra Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गुरुवारी एकाच दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होण्यामागे मुख्यमंत्र्यांचे राजकीय चातुर्य कारणीभूत ठरल्याचे केंद्रीय नेतृत्वावर ठसवण्याचा प्रयत्न या भेटीतून करण्यात आला आहे. या भेटीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक हेही सहभागी झाले होते.

Narendra Modi
Nilesh Cabral: जुन्या जलवाहिन्या, मीटर बदलणार; पाण्याची नासाडी टाळण्‍यासाठी 'साबां'ची नवी मोहिम

आरोग्‍य तथा वनमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीवारीकडे सगळ्यांचे लक्ष होते. याबाबत मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकला सांगितले की, या भेटी सर्वसाधारण स्वरूपाची होत्या.

खासदार झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी तानावडे यांनी वेळ घेतली होती. ते बिनविरोध निवडून येण्यात माझाही वाटा आहे म्हणून त्यांच्या इच्छेनुसार मी दिल्लीला गेलो. अर्थात केंद्रीय नेतृत्वाची भेट होते तेव्हा राज्यातील राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीची चर्चा होणे स्वाभाविकच.

Narendra Modi
Goa Revenue Department: महसूलमंत्र्यांच्‍या कार्यालयाकडून बांधकाम व्‍यावसायिक वेठीस! राज्‍याचा कोट्यवधींच्या महसूलावर पाणी

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खासदार होण्याची संधी दिल्यानंतर ऋणनिर्देश करण्याची इच्छा होती म्हणून या भेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांची खंबीर साथ होती म्हणूनच हे शक्य झाले. त्‍यामुळे त्यांनी या भेटींवेळी यावे असा आग्रह केला व त्‍यांनीही तो मान्‍य केला.

- सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nandan Nilekani Exam Reform Task Force
Congress Working President Sunil Kavathankar
Narendra Sawaikar Post Controversy
PM Narendra Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com