गोवा: भाजपने आज गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आपले 34 उमेदवार जाहीर केले. दरम्यान भाजपचे जाहीर करण्यात आलेले उमेदवार हा आता मोठा चर्चेचा मुद्दा ठरत आहे. या मध्ये काही उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आहेत; तर भाजपची घराणेशाही जोरात असून, दोन बडे नेते सपत्नीक मैदानात उतरले आहेत. याशिवाय भाजपच्या गोत्यात असणारे दोन अपक्ष आमदार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यापैकी एक पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे तर दुसरे प्रियोळ मतदार संघातून अपक्ष आमदार गोविंद गावडे हे असणार आहेत. या अपक्ष आमदारांना उमेदवारी देउन आता भाजपच्या परड्यात मतदारांची श्रीमंती वाढली आहे. (goa BJP Candidate for two independent MLA Govind Gawde and Rohan Khanwate)
अपक्ष आमदार आमदार रोहन खंवटे
आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) हे पर्वरीचे अपक्ष आमदार असून यांनी 15 डिसेंबर रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला व त्या संदर्भात चे पत्र आज उपसभापती राजेश पाटणेकर यांना सादर केले होते. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते आगामी विधानसभा निवडणूक भाजप पक्षातून निवडणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी 17 डिसेंबर रोजी भाजप पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant),भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे (Sadanand Sheth Tanawade) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पार पडला होता.
अपक्ष आमदार गोविंद गावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अपक्ष आमदार गोविंद गावडेंना (Govind Gaude) प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. यानंतर प्रियोळ मतदारसंघात गावडे समर्थकांनी ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली होती. 'प्रियोळकरांनी धरला जोर, गोविंद गावडे वन्स मोअर', अशा आशयाची पोस्टरबाजी प्रियोळच्या चौकाचौकात करण्यात आल्याचं चित्र होतं. 11 जानेवारी रोजी गोविंद गावडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र प्रियोळमधील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र गावडेंच्या उमेदवारीला पूर्णपणे विरोध केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.