Stray Dog Issue in Goa : गोवा रेबीजमुक्त; पण कुत्रे चावण्यापासून नव्हे

दररोज आठ ते दहा घटना : भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय ; निर्बिजीकरण व्हावे प्रभावी
Dog
Dog Dainik Gomantak
Published on
Updated on

धीरज हरमलकर

कुत्रा हा निश्‍चितच पृथ्वीवरील एक निष्ठावान आणि सुंदर प्राणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अचानकपणे भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या ही सर्वांच्याच चिंतेची बाब ठरली आहे.

कारण भटक्या कुत्र्यांची संख्या वाढण्याबरोबरच कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेकजण जायबंदी होण्याचे तसेच काहींवर जीव गमावण्याचेही प्रसंग घडले आहेत. शिवाय कुत्र्यांच्या चाव्याचे प्रकारही वाढत आहेत.

गोवा रेबीज मुक्त राज्य आहे, कारण गेल्या काही वर्षांपासून रेबीजचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु हे राज्य अद्याप कुत्र्यांचे हल्ले आणि चाव्याच्या घटनांपासून मुक्त नाही. गोमेकॉच्या कॅज्युअल्टी वॉर्डमधील परिचारिकांनी सांगितले की, दररोज सरासरी 8 ते 10 कुत्रे चावण्याची प्रकरणे गोमेकॉत येतात.

प्राप्त आकडेवारीनुसार, 2021 मध्ये 97 कुत्रे चावल्याची प्रकरणे होती, 2022 मध्ये ती चिंताजनक 282 प्रकरणे होती. 2023 मध्ये 18 मे पर्यंत 72 कुत्रे चावल्याची नोंद झाली आहे. भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याची गरज आहे,असे गोमंतक पशु रक्षक संस्थेच्या संस्थापक ग्रेस कारे यांना वाटते.

Dog
Elon Musk यांची मोठी घोषणा; दोन तासांचे व्हिडीओ करता येणार अपलोड

आरोग्य केंद्रात नोंदी

गोव्यातील 2 जिल्हा रुग्णालये, 2 उपजिल्हा रुग्णालये, 6 सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि 24 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या सर्व कुत्र्यांच्या चाव्याच्या प्रकरणांची सरकारी आरोग्य केंद्रात नोंद करण्यात आली असून त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण व कुत्रा चावण्यासंबंधी इतर उपचार रूग्णांना मिळाले आहेत.

कुत्रा चावण्याची प्रकरणे

वर्ष प्रकरणे

  • 2018 22527

  • 2019 2090

  • 2020 9556

  • 2021 9126

  • 2022 23903

  • 2023 542

Dog
Healthy Tips: तुम्ही सॅलडमध्ये लिंबू अन् मीठ टाकतायं? वेळीच व्हा सावध

कुत्र्यांचे निर्बिजीकरण काळाची गरज

पणजीतील प्राणी हक्क कार्यकर्ते कबीर गामा रॉय म्हणाले, चाव्यासाठी वा हल्ल्यासाठी भटक्या कुत्र्यांना दोष देणे चुकीचे आहे. खरं तर कुत्र्यांची संख्या का वाढतेय, स्थानिक प्रशासन याबद्दल काय करत आहे, हे पाहणे गरजेचे आहे. गोव्यात सध्या दीड लाख भटकी कुत्री आहेत. या वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे माणूस-कुत्रा संघर्ष होईल,अशी भीती आहे.

भटक्या कुत्र्यांना खायला घालणारे फीडर्स त्यांना शांत ठेवण्याचे उत्तम काम करत आहेत. पण दुर्दैवाने काही लोक त्यांनाच लक्ष्य करतात. नोव्हेंबर २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कुत्र्यांना न मारता सामूहिक नसबंदी करा,असा आदेश दिला. त्या आदेशाचे पालन गरजेचे आहे, असे रॉय पुढे म्हणाले.

Dog
Goa Water Shortage : मॉन्सून लांबणार; ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची चिंता

भटक्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणावर नसबंदी करण्याची गरज आहे. कारण मुरगाव परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. कुत्र्यांना अन्न, पाणी आणि प्रजनन करण्यास हंगामात न मिळाल्यास ते आक्रमक होतात. राज्यातील भटक्या कुत्र्यांचे सामूहिक नसबंदी करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि प्राणी कल्याणकारी संस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

एलिझाबेथ वल्सन,पीपल फॉर अ‍ॅनिमल, वास्को

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com