
कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कळंगुटमध्ये 'गुंडाराज' सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खाऊन पैसे न देता, वेटरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून, घटनेला ६० तासांहून अधिक वेळ उलटूनही आणि सीसीटीव्हीमध्ये गुंडांचे चेहरे स्पष्ट दिसत असतानाही, पोलिसांच्या हाती अजून कोणीही लागलेले नाहीत. या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी या घटनेनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरा सत्तेची ११ वर्षे साजरी करत आहेत, मात्र दुसरीकडे गोवेकर ११ वर्षे घाबरून जगत आहेत."
त्यांनी थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला 'गुंडाराज' आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्या पर्यटनखात्याला 'बनावट सुरक्षित पर्यटन' असं म्हणत त्यांच्या कामावर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पाटकर यांनी पुढे म्हटले की, "कळंगुटमधील एका प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये गुंड जेवतात, कर्मचाऱ्याला मारहाण करतात आणि पळून जातात, हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. ६० तासांहून अधिक वेळ झाला तरी एकही अटक नाही. गोवा पोलिसांना तर त्यांनी थेट लाज वाटत नाही का? असा प्रश्न केलाय. तुम्ही गोवेकरांचे संरक्षण करत आहात की गुन्हेगारांचे? हे शासन नाही. हे जंगलराज आहे." असं म्हणत त्यांनी सरकारला फटकारलं आहे.
या घटनेमुळे गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः पर्यटनस्थळांवर अशा घटना घडल्यास गोव्याच्या 'सुरक्षित पर्यटन' प्रतिमेला मोठा धक्का लागू शकतो.
विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर दबाव वाढवला असून, तातडीने आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, अशा घटनांमुळे सामान्य नागरिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठा धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.