Goa: अखेर डिचोलीत आठवडी बाजार भरलाच नाहीच...

पालिकेच्या कडक भुमिकेमुळे विक्रेत्यांची माघार (Goa)
The municipality denied permission to the Bicholim weekly market (Goa)
The municipality denied permission to the Bicholim weekly market (Goa)Dainik Gomantak

Goa: पालिकेच्या कडक भुमिकेमुळे अखेर आज (बुधवारी) डिचोलीत आठवडी बाजार (Bicholim Weekly Market) भरलाच नाही. विक्रेत्यांना बाजारात बसण्यास प्रतिबंध करतानाच, भाजीवाहू वाहनांनाही बाजारात प्रवेश बंद (No Entry in Market) करण्यात आला होता. बाजार भरणार नसल्याचे दिसून येताच, आठवडी बाजारासाठी आलेल्या विक्रेत्यांना माघारी परतावे लागले. तर आठवडी बाजार खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही गैरसोय झाली. आठवडी बाजार भरला नसला, तरी बाजारातील अन्य व्यवहार मात्र नियमितपणे सुरु होते. डिचोलीत आज आठवडी बाजार भरणार नसल्याचे वृत्तही 'दैनिक गोमन्तक' मधून देण्यात आले होते.

The municipality denied permission to the Bicholim weekly market (Goa)
The municipality denied permission to the Bicholim weekly market (Goa)Dainik Gomantak

प्रशासकीय अनुमती मिळेपर्यंत आठवडी बाजार बंद

अनुमती नसतानाही जवळपास तीन महिन्यानंतर गेल्या बुधवारी डिचोलीत आठवडी बाजार भरला होता. बाजारात बसलेल्या विक्रेत्यांना पालिकेने हुसकावून लावल्यानंतर सायंकाळी काही विक्रेत्यांनी बाजारात कब्जा करून धंदा सुरु केला होता. या विक्रेत्यांविरोधात पालिकेने कारवाई सुरु करताच, गोंधळ निर्माण झाला. मार्केट निरीक्षकांना धमकावण्यातही आले. या प्रकाराची पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी गंभीर दखल घेताना प्रशासकीय अनुमती मिळेपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवावा (Bicholim Municipality refused permission). जबरदस्तीने बाजार सुरु करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करावी. अशी सुचना त्यांनी गेल्या गुरुवारी मार्केट निरीक्षकांना केली होती. त्यामुळे आज बाजार सुरु करू द्यायचाच नाही. अशी तयारी पालिकेने ठेवली होती. पालिकेकडून कारवाई अटळ असल्याचे समजताच आज दुपारपर्यंत बाजारात बसण्याचे विक्रेत्यांनी धाडस केले नाही.

प्रवेश बंद

आठवडी बाजार सुरु करण्याचा प्रयत्न झाल्यास तो मोडून काढण्यासाठी मार्केट निरीक्षकांसह पालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच बाजारात तळ ठोकला होता. पारंपरिक नियमित विक्रेते वगळता अन्य एकाही विक्रेत्याला या अधिकाऱ्यांनी बाजारात बसू दिले नाही. भाजीवाहू वाहने बाजारात येता कामा नये. त्यासाठी बाजारात जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे निर्माण करण्यात आले होते. बाजारात पालिकेचे कर्मचारी लक्ष ठेवून होते.

विक्रेते माघारी

गेल्या आठवडी बाजाराप्रमाणे आजही भाजी आणि फळ विक्रेत्यांसह रेडिमेड कपडे, प्लास्टिकच्या वस्तू आदी सामान विकणारे विक्रेते डिचोलीत आले होते. बराचवेळ प्रतीक्षा केल्यानंतर आठवडी बाजार भरणार स्पष्ट होताच या विक्रेत्यांनी आल्या पावली माघारी परतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com