Goa News: डिचोलीत कला भवनसाठी प्रयत्न

Goa News: गोविंद गावडे : सम्राट क्लबतर्फे रंगभूमीदिन उत्साहात
Govind Gaude | Goa News
Govind Gaude | Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: मंदिरांसमोरील दीपस्तंभापासून कलेचा उगम झाला असून, मंदिरांतूनच कलेला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. जागा उपलब्ध झाल्यास डिचोलीत निश्चितच कला भवन उभारू, अशी ग्वाही कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. मराठी रंगभूमी दिनानिमित्त डिचोली सम्राट क्लबतर्फे आयोजित सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

बोर्डे येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सम्राट क्लब राज्य- एकचे अध्यक्ष अवीन नाईक, सिद्धिविनायक देवस्थानचे अध्यक्ष देविदास जांभळे, डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष नीलेश टोपले, सचिव प्रवीण सावंत, खजिनदार शेखर नाईक आणि कार्यक्रम समन्वयक भारत चणेकर उपस्थित होते.

Govind Gaude | Goa News
Goa News: कार्डियाक युनिटला डॉ. मंजुनाथ देसाईंचे नाव द्या - प्रमोद सावंत

यावेळी अवीन नाईक यांनी डिचोली सम्राट क्लबच्या कार्याची प्रशंसा केली. विद्याधर शिरोडकर, गुरुदास कोरगावकर, सत्यवान नाईक आणि प्रवीण सावंत यांनी सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन केले. शुभा वालावलकर दिक्षित यांनी डिचोलीत कला भवनची मागणी केली.

तत्पूर्वी विष्णू गावस (कृष्ण) आणि कांचन भिडे (रुक्मिणी) या कलाकारांनी ‘सं. सौभद्र’ नाटकातील प्रवेश सादर केला. या प्रवेशाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. नीलेश टोपले यांनी स्वागत केले. यदुनाथ शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

Govind Gaude | Goa News
वाळपई येथील नगरपालिका कामगार संपावर | VMC workers go on strike after delayed payments | Gomantak Tv

नाट्यकलाकारांचा सत्कार

या सोहळ्यात राघोबा सातार्डेकर, प्रकाश नार्वेकर, शिवदास कवठणकर व शुभा वालावलकर या नाट्यकलाकारांचा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्कृती संवर्धनात सम्राट क्लबचे कार्य अतुलनीय आहे. आजच्या युवकांनी नाट्य, संगीत आदी कलांद्वारे आपले भवितव्य घडवतानाच कला, संस्कृतीचे जतन करावे.

- गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com