Goa Festival: वाळवंटी नदी पात्रात रंगली अनोखी ‘नौकाविहार’ स्पर्धा

Goa Festival: साखळीत दोन वर्षांनंतर लोटला भक्तांचा महापूर
Navkavihar Competition | Goa News
Navkavihar Competition | Goa News Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Festival: हजारो भक्तगणांच्या साक्षीत प्रति पंढरपूर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या साखळीतील विठ्ठलापुरात 'त्रिपुरारी पौर्णिमा' प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण असलेली नौकाविहार स्पर्धा यंदा रंगतदार झाली.

राज्य सरकारचे पर्यटन, कला आणि संस्कृती, माहिती आणि प्रसिद्धी खाते तसेच श्री विठ्ठल देवस्थान आणि विठ्ठलापूर दीपावली उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव साजरा करण्यात आला. ''कोरोना'' महामारीमुळे गेली दोन वर्षे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता.

त्रिपुरासुराचा वध

यंदा नौकाविहार स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 34 नौका स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. बँडवादनासह श्री विठ्ठल-रखुमाईची पालखी वाळवंटी नदीकाठी आल्यानंतर नदीपात्रात उभारलेल्या रंगमंचावर दशावतारी कलाकारांतर्फे त्रिपुरासुर वधावरील नाट्यप्रवेश सादर करण्यात आला.

नदीपात्रात उभारलेल्या प्रतिकात्मक त्रिपुरासूराचा वध केल्यानंतर नदीपात्रात नौकाविहारचा जल्लोष सुरु झाला. मध्यरात्रीपर्यंत नौकाविहार स्पर्धा रंगली. वाळवंटी नदीकाठी गर्दी केलेल्या हजारो भक्तांनी आकर्षक सुंदर अशा नौकांचे नेत्रसुख घेतले. तत्पूर्वी श्रीकृष्ण मिरवणूक, दीपदान आदी कार्यक्रम पार पडले.

उत्कृष्ट नौका ‘इफ्फी’त!

साखळीतील नौकाविहार स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्कृष्ट दहा नौकांना यंदाच्या ''इफ्फी''त सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पर्यटन खात्यातर्फे तसे जाहीर करण्यात आले आहे. निवडण्यात आलेल्या दहा बोटी ''इफ्फी'' काळात राजधानी पणजीत प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत.

साखळीतील नौकाविहार स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्कृष्ट दहा नौकांना यंदाच्या ''इफ्फी''त सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. पर्यटन खात्यातर्फे तसे जाहीर करण्यात आले आहे. निवडण्यात आलेल्या दहा बोटी ''इफ्फी'' काळात राजधानी पणजीत प्रदर्शनार्थ ठेवण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Foundational Learning Survey
West Zone Athletics
Goa Building Rules 2023
Ganesh Chaturthi Spiritual Significance Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com