Climate Change In Goa: ही तर हवामानातील बदलाची चाहूल; ऐन पावसाळ्यात डिचोलीवर धुक्याची चादर, हवेत गारठा

हवामानाचा लहरीपणा : ऐन पावसाळ्यात गडद चादर; आश्‍‍चर्य व्‍यक्त
Climate Change In Goa
Climate Change In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Climate Change In Goa गेल्या काही दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल जाणवत आहे. आज मंगळवारी तर अनेकांना हवामानाच्या लहरीपणाची चांगलीच अनुभूती आली. पावसाळ्याचे दिवस असतानाही पहाटे डिचोलीतील अनेक भागात गडद धुके पडले. काही भागात तर धुक्याची गडद चादर पसरल्याचा आभास होत होता.

सकाळी साधारण साडेसात वाजेपर्यंत धुक्याचा प्रादुर्भाव जाणवला. हे विहंगम दृश्‍‍य अनेकांनी आपल्‍या कॅमेऱ्यात कैद केले. कवीमनालाही नवी पालवी फुटली. मात्र भर पावसाळ्यात धुके पडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. दुसऱ्या बाजूने सतत धुके पडत राहिल्यास भात आदी बागायती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही कृषी खात्याकडून मिळाले आहेत.

Climate Change In Goa
Banastarim Bridge Accident: मेघनाला उच्च न्यायालयाचा दणका! 2 कोटी जमा करण्याचे निर्देश

पूर्णपणे हरवली वाट

आज मंगळवारी पहाटेपासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत धुक्याचा प्रादुर्भाव होता. नंतर मात्र सूर्यप्रकाशाचे दर्शन झाले. गडद धुक्यामुळे डिचोलीत सर्वत्र समोरचे अस्पष्ट दिसत होते. धुक्यात वाट हरवल्यागत अनुभव येत होता.

धुक्यामुळे वाहनांच्या वेगावरही नियंत्रण आले होते. दिवे पेटवूनच वाहने हाकण्याची वेळ वाहनचालकांवर आली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत वाहनचालकांना ही कसरत करावी लागली.

Climate Change In Goa
Goa University मधील धमकीप्रकरणी तक्रारच नाही! प्राध्यापकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न; तर कुलगुरूंचे कारवाईचे आश्‍वासन

धुके ही नैसर्गिक क्रिया असली तरी पावसाळ्यात धुके पडणे ही हवामानातील बदलाची चाहूल आहे. अधूनमधून धुके पडले म्हणून त्याचा विशेष परिणाम होत नाही. मात्र सतत धुके पडल्यास शेती आणि बागायती पिकांवर परिणाम होण्याची भीती असते.

- दीपक गडेकर, कृषी अधिकारी (डिचोली)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com