Chlorine Gas Leak Assonora : क्लोरीन वायूची तिसऱ्यांदा गळती; जलशुद्धीकरण प्रकल्पात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अस्नोड्यात घबराट : जलशुद्धीकरण प्रकल्पात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Chlorine Gas Leak
Chlorine Gas LeakDainik Gomantak
Published on
Updated on

Chlorine Gas Leak Assonora अस्नोडा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन गॅसला लागलेली गळती नियंत्रणात आणून 24 तास उलटण्याआधीच आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा गळती झाली.

सलग दुसऱ्या दिवशी आणि चार दिवसांच्या कालावधीत तिसऱ्यांदा गॅस गळतीची घटना घडल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकल्पातून वारंवार क्लोरीन वायूची गळती होत असल्याने या प्रकल्पाच्या परिसरातील लोक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. मात्र, कालच्या तुलनेत आज गॅस गळतीचा प्रादुर्भाव किंचित कमी होता. तरीही धोका कायम आहे.

Chlorine Gas Leak
CM Apprenticeship Policy: 15 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी, मात्र नोंदणी केवळ 8502 जणांची

डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तीनहून अधिक तास जीव धोक्यात घालून गॅस गळती नियंत्रणात आणली. सुरवातीला गॅस गळती नियंत्रणात आणल्यानंतर पुन्हा गळती सुरू झाली. त्यामुळे जवानांना पुन्हा मदतकार्य करावे लागले.

शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. गॅस गळती थांबल्यानंतर क्रेन आणून वारंवार गळती होणारा क्लोरीन गॅसचा सिलिंडर सुरक्षात्मक उपाय म्‍हणून पाण्‍याच्या टाकीत हलविण्‍यात आला आहे. गॅस सिलिंडरच्या सदोष नोजलमुळे ही समस्या उदभवल्याचे सांगण्यात आले.

Chlorine Gas Leak
Bank Fraud: कर्जासाठी मालमत्ता गहाण मात्र 'अशाप्रकारे' केलीय बँकेची 9 कोटींची फसवणूक; बेतकी-खांडोळा येथील प्रकार उघड

तज्ज्ञांचे प्रयत्न निष्फळ

मंगळवारी गॅस गळती लागली होती. ती नियंत्रणात आणली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा गॅसची गळती झाली. मात्र, अग्निशमन दलाचे जवान आणि डेक्कन कंपनीच्या तज्ज्ञ पथकाने पाच तास शर्थीचे प्रयत्न करून गॅसची गळती नियंत्रणात आणल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली होती.

Chlorine Gas Leak
Babush Monserrat: सुनावणीस गैरहजर राहण्याच्या मागणीला सीबीआयचा आक्षेप

‘अग्निशमन’चे निकराचे प्रयत्न : गॅस गळती सुरू झाल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाला मिळताच अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी प्रकल्पस्थळी धाव घेतली. लिडींग फायर फायटर राजन परब यांच्यासह शैलेश साळकर, विशांत वायंगणकर, विष्णू राणे, भारत म्हाळशेकर यांनी मदतकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com