वास्को : श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीने (बाजारकार) विश्वासात न घेतल्याने यंदा श्री दामोदर भजनी सप्ताहात सहभागी होणार नसल्याचा विविध पार समित्याने (बाजारकार समिती व्यतिरिक्त) निर्णय घेतला असल्याचे विविध समिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली.
विविध पार समित्या (बाजारकार समिती व्यतिरिक्त) या वर्षीच्या सप्ताहात सहभागी होणार नाहीत. आर्थिक परिस्थितीमुळे नव्हे तर त्यांना आयोजन समितीने विश्वासात घेतले नाही असा त्यांचा आरोप आहे.
यंदाच्या पार मिरवणुकीच्या 13 जुलै रोजी झालेल्या बैठकीत आमच्याकडे शेवटच्या क्षणी गायकांना संघटित करण्यासाठी पुरेसा वेळ नाही. यंदा पार व गायनाच्या बैठका होणार नाहीत.
तेव्हा सगळ्या पार समित्यानी बाजारकार समिती म्हणजे उत्सव समिती बरोबर यंदाही गायनाच्या मैफली न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उत्सव समितीने शेवटच्या क्षणी आम्हा सर्व पार समित्यांना विश्वासात न घेता पार व गायनाच्या बैठकीचे आयोजन केले आहे, असा आरोप विविध पार समितींच्या (बाजारकार समिती व्यतिरिक्त) सर्व प्रतिनिधींनी केला आहे. यामुळे यंदाची उत्सव समिती पूर्णपणे सपशेल अपयशी ठरली असल्याची माहिती पार समितीने दिली आहे.
बाजारकार समितीने त्यांचा निर्णय इतर पार समिती सदस्यांना कळवणे गरजेचे होते. कारण त्यांनी गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ या उत्सवात सक्रिय भाग घेतला होता. यंदा श्री दामोदर सप्ताहाला 123 वर्षे पूर्ण होत आहेत.
पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या विविध पार समित्यांच्या बाजारकार उत्सव समिती व्यतिरिक्त सर्व प्रतिनिधींनी बाजारकार उत्सव समितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही लोकांच्या भावनाशी खेळू नये, तर पुढच्या वर्षी आम्ही उत्सवात सहभागी होऊ आणि हा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडेल हे बघू असे पार प्रतिनिधींनी सांगितले.
कला आणि संस्कृती विभागाने बाजारकार समितीला निधीचे वाटप केले. परंतु त्यांना मिळालेला आर्थिक निधी इतर पार समित्यांना वाटला नाही. आम्ही सरकारकडून कोणतेही आर्थिक सहाय्य घेत नाही, परंतु आम्ही स्वतःचा निधी गोळा करतो, तर क्वचितच कोणी प्रयोजक असतात असे गाडेकार समाजाचे सचिव विशाल भानुदास नाईक यांनी सांगितले.
आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दैवज्ञ ब्राह्मण समाज श्री ओवळेश्वर गोपाळ कृष्ण गाडेकार समाज, मुरगाव पतन्यास पैलवाले कामगार, सत्संग नाभिक समाज, श्रीराम विश्वकर्मा ब्राह्मण समाज या पार समितीच्या संबंधित प्रतिनिधींनी भाग घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.