गोवा खंडपीठाने रद्द केली प्रसाद गावकरांची 12 टक्के ST आरक्षण याचिका

गोवा निवडणुकीत एसटीसाठी 12 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या बाजूने भाजप नसल्याचे चित्र
Goa bench quashes Prasad Gaonkar 12 per cent ST reservation plea
Goa bench quashes Prasad Gaonkar 12 per cent ST reservation plea Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनुसूचित (ST) जमातीसाठी 12 टक्के आरक्षण (चार मतदारसंघ) ठेवण्यासंदर्भात अपक्ष माजी आमदार व काँग्रेसचे सांगेचे संभाव्य उमेदवार प्रसाद गावकर व इतरांनी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज फेटाळली.(Goa bench quashes Prasad Gaonkar 12 per cent ST reservation plea)

Goa bench quashes Prasad Gaonkar 12 per cent ST reservation plea
Goa Election: 'आयात नव्हे निष्ठावंताना तिकिट द्या'

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून द्या

येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या मागणीची पूर्तता झाली नाही, तर आदिवासी म्हणून जगत असलेल्या धनगर समाजाला कडक पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. असेही समाज बांधवांनी स्पष्ट केले आहे.

3 जानेवारी सुरू झाली सुनावणी

आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय घटनेच्या कलम 334 नुसार अनुसूचित जमातींच्या (एसटी) जागांच्या आरक्षणासंबंधी आमदार प्रसाद गावकर यांच्या याचिकेवरील सुनावणी 3 जानेवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर (Goa Bench of the Mumbai High Court) सुरू झाली. या समाजाला आरक्षण न देता त्यांना घटनात्मक अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा युक्तिवाद याचिकादार याच्या वकिलांनी केला.

Goa bench quashes Prasad Gaonkar 12 per cent ST reservation plea
Goa Election 2022: गोवा फॉरवर्डने बोलावली तातडीची बैठक

2001 साली राज्यात सुमारे 12 टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या होती.

त्यामुळे गावडा, कुणबी आणि वेळीप यांना 2003 मध्ये अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला होता. त्यानुसार या समाजाला विधानसभा निवडणुकीत 4 ते 5 जागा आरक्षित ठेवणे क्रमप्राप्त होते. मात्र, 2007 च्या निवडणुकीत (Election) आरक्षण देण्यात फेररचना आयोग अपयशी ठरले होते. 2013 मध्ये केंद्र सरकारने या आरक्षणासाठीचा (Reservation) अध्यादेश काढला. मात्र तूर्त तो रद्द करण्यात आला. त्यानंतर 2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, अशा युक्तिवाद करण्यात आला होता.

एसटीसाठी 12 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या बाजूने भाजप नसल्याचे चित्र

विधानसभा निवडणुकीत एसटीसाठी 12 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या बाजूने भाजप नसल्याचे दिसून येते. आदिवासी समाजाला गोवा विधानसभा निवडणुकीत 22 मध्ये आरक्षण मिळावे यासाठी केलेल्या याचिकेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून भाजप सरकार गोव्यातील आदिवासी समाजाला घटनात्मक अधिकार देण्यास अनुकूल नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भाजपने (BJP) गोव्यातील आदिवासी समाजाची पूर्णपणे उपेक्षा केली आहे, अशी बाजू मांडण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com