Goa Bench: समुद्रकिनाऱ्यांवर रांग प्रणालीची अंमलबजावणी करा; गोवा खंडपीठाचे निर्देश

Water Sports In Goa: पर्यटन खात्याचे जलक्रीडा धोरण लागू असलेल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवरील जलक्रीडा ऑपरेटर्ससाठी हा आदेश खंडपीठाने सरकारला दिला आहे
Water Sports In Goa: पर्यटन खात्याचे जलक्रीडा धोरण लागू असलेल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवरील जलक्रीडा ऑपरेटर्ससाठी हा आदेश  खंडपीठाने सरकारला दिला आहे
Goa Bench of Mumbai High Court Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पर्यटन खात्याचे जलक्रीडा धोरण लागू असलेल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवरील जलक्रीडा ऑपरेटर्ससाठी रांग प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिला आहे. माजोर्डा येथील दोघा जलक्रीडा ऑपरेटर्सचे क्षेत्र उतोर्डा व बेताळभाटी येथे स्थलांतर करण्यात आलेला बंदर कप्तान खात्याचा आदेश गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरविला.

माजोर्डा येथील सुकोरिना जोनिता पेरेरा व आगुस्तिनो शेल्टन दा सिल्वा या दोघांना बंदर कप्तान खात्याने आदेश जारी करून त्यांना माजोर्डा समुद्रकिनाऱ्याऐवजी इतर ठिकाणी जलक्रीडा प्रकार व्यवसाय करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते.

Water Sports In Goa: पर्यटन खात्याचे जलक्रीडा धोरण लागू असलेल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवरील जलक्रीडा ऑपरेटर्ससाठी हा आदेश  खंडपीठाने सरकारला दिला आहे
Water Sports In Goa: विनापरवाना जलक्रीडा व्यावसायिकांवर होणार कडक कारवाई; पर्यटनमंत्र्यांचा सज्जड दम!

त्यांनी याचिकेत सरकार, पर्यटन खाते, बंदर कप्तान खाते, मिनिनो फर्नांडिस, बेनेडिक्टा फर्नांडिस, दक्षिण गोवा जलक्रीडा असोसिएशन व कोलवा पोलिसांना प्रतिवादी केले होते.

दरम्यान, जलक्रीडा धोरणानुसार सर्व ऑपरेटर्सनी रांग प्रणालीनुसार त्यांची संधी येईल तेव्हा व्यवसाय करण्याचे तसेच एकखिडकी दालनातून तिकिटे देण्याची तरतूद आहे. बंदर कप्तान यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असा दावा करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa HC rejects ECI stay request
West Zone Athletics
Enemy Property Case Goa
Colombo High Court Sentences 15 Convicts to 220 Years
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com