आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Goa Bench BNSS 2023: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ नुसार आरोप निश्चित करण्यापूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे हे सत्र न्यायालयाचे कर्तव्य आहे.
Goa Bench BNSS 2023
Goa Bench Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ नुसार आरोप निश्चित करण्यापूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे हे सत्र न्यायालयाचे कर्तव्य आहे. सत्र न्यायालयाकडे खटला वर्ग झाल्यानंतर ६० दिवसांच्या मुदतीत दोषमुक्ततेचा (डिस्चार्ज) अर्ज दाखल केला नसला, तरी आरोपीचा न्यायालयासमोर आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.

न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून आरोपींची बाजू ऐकून घेतल्यानंतरच आरोप निश्चितीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.पेडणे पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार उदय प्रभुदेसाई आणि उगम प्रभुदेसाई यांच्यावर भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत पंचसदस्याला अडवणे, मारहाण, लैंगिक छळ आणि चोरीचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

Goa Bench BNSS 2023
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

महत्त्‍वपूर्ण निरीक्षण

आरोप निश्चित करण्यापूर्वी आरोपीची बाजू ऐकणे सत्र न्यायालयाचे कर्तव्य.

६० दिवसांत दोषमुक्तता अर्ज दाखल न केल्याने आरोपीचा युक्तिवादाचा अधिकार संपत नाही.

सरकारी पक्षाच्या कागदपत्रांत प्रथमदर्शनी तथ्य आहे का, याची न्यायालयाने तपासणी करणे आवश्यक.

आरोपीला आपले म्हणणे मांडण्याची संधी न देणे ही प्रक्रियात्मक चूक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com