Goa Road Accident: खड्डे-बार्से येथे ट्रक अपघातात ठार झालेला चालक बेळगावचा

Goa Road Accident: दियेश्वर याची प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍याला गोमेकॉ इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे.
Goa Road Accident
Goa Road AccidentDainik Gomantak

Goa Road Accident: मडगाव-कारवार हमरस्‍त्‍यावर काल रात्री खड्डे-बार्से येथे दोन ट्रकांमध्‍ये झालेल्‍या अपघातात ठार झालेला ट्रकचालक हा बेळगावचा असून त्‍याचे नाव उमेश तलवार (वय 23) असे असल्‍याची माहिती कुंकळ्‍ळी पोलिसांनी दिली.

जखमी अवस्‍थेत त्‍याला मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळात आणले असता तिथे त्‍याला मृत जाहीर करण्‍यात आले.

या अपघातात दुसऱ्या ट्रकाचा चालक दियेश्वर पोतदार (26) आणि क्लिनर पुष्‍कर कांबळे (24) हे दोघे कोल्‍हापूरचे असून ते जखमी झाले होते.

दियेश्वर याची प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍याला गोमेकॉ इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले आहे, तर पुष्‍कर याला आज इस्‍पितळातून घरी पाठविण्‍यात आले.

काल रात्री या दोन्‍ही ट्रकांची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला होता. उमेश तलवार बॉक्‍साईडचा माल भरून मडगावहून काणकोणच्‍या दिशेने जात होता, तर दुसऱ्या बाजूने लाकडी सामान घेऊन दुसरा ट्रक येत होता.

या दोन्‍ही ट्रकांची टक्‍कर झाल्‍यानंतर तलवार याचे वाहनावरील नियंत्रण गेल्‍याने त्‍याचा ट्रक बाजूच्‍या दरीत कोसळला. त्‍यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी सध्‍या कुंकळ्‍ळीच्‍या उपनिरीक्षक कविता रावत तपास करीत आहेत.

गोव्यात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्यात सरासरी दिवसागणिक एक अपघात होत आहे. यातील बरेचसे अपघात हे वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होत असल्याचे दिसून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com