Sea pollution : सागरी प्रदूषणाच्या मुकाबल्यासाठी कृती आराखडा हे महत्त्वपूर्ण पाऊल : डॉ. एस.रामचंद्रन

Sea pollution : प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही सामूहिक कृती करणे अत्यावश्यक आहे. प्लास्टिक कचरा आणि आमच्या सागरी परिसंस्थेचे संरक्षण करा, असे आवाहन फिशरीज सर्व्हे ऑफ इंडियाचे डॉ.एस. रामचंद्रन यांनी केले.
goa
goaDainik Gomantak

Sea pollution :

वास्को, आम्ही भारतातील प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमाण मोजू आणि प्रदूषण रोखण्यास कृती आराखडाही तयार केला आहे.

प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही सामूहिक कृती करणे अत्यावश्यक आहे. प्लास्टिक कचरा आणि आमच्या सागरी परिसंस्थेचे संरक्षण करा, असे आवाहन फिशरीज सर्व्हे ऑफ इंडियाचे डॉ.एस. रामचंद्रन यांनी केले.

सागरी प्रदूषणाचा मुकाबला करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, देशाच्या मत्स्योद्योग विभागाने बायणा आणि खारीवाडा येथे स्थानिक मच्छिमार आणि बोट मालकांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत डॉ. रामचंद्रन बोलत होते. समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांबद्दल जागरूकता करण्यावर आणि शाश्वत मासेमारीच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला.

goa
Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

मत्स्यव्यवसाय विभाग, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया, मासेमारी समुदाय, स्थानिक अधिकारी आणि पर्यावरण तज्ञ या प्रमुख प्रतिनिधींचा उपस्थितांत समावेश होता. ज्यांनी एकत्रितपणे सागरी वातावरणात प्लास्टिक कचऱ्याविषयी चर्चा केली.

या सत्रात माहितीपूर्ण सादरीकरणे, खुली चर्चा आणि व्यावहारिक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्याचा उद्देश मच्छिमारांना प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे सागरी जीवनावर आणि त्यांच्या उपजीविकेवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल विचारविनिमय करणे होता.

पत्रकारांशी बोलताना डॉ. एस. रामचंद्रन म्हणाले की, प्लास्टिक प्रदूषण महासागर आणि मासेमारी उद्योगाच्या टिकावासाठी ‘महासागर स्वच्छ करणे, मासे वाचवणे, उपजीविका टिकवणे आणि सागरी प्रदूषण टाळण्यासाठी ३० हून अधिक देशांचा सहभाग असलेला हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे.

प्लास्टिक प्रदूषण ही एक अतिशय गंभीर समस्या आहे जी अनेक दशकांपासून होत आहे आणि त्यामुळे समुद्रात प्लास्टिक जमा होत आहे, म्हणूनच हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने आयोजित केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com