गोव्यातील शास्त्रज्ञाकडे रामायणावर आधारीत 300 टपाल तिकिटांचा संग्रह; 50 वर्षांपासून जपतायेत आगळावेगळा छंद
गोव्यातील निवृत्त शास्त्रज्ञ आणि पत्रलेखकाने रामायणावर आधारीत 300 हून अधिक टपाल तिकिटांचा संग्रह केला आहे. आग्नेय आशियामधून सापडलेल्या या तिकिटांमध्ये रामायण’ महाकाव्यातील विविध पात्रे आणि दृश्ये दर्शविली आहेत.
मागील 50 वर्षांपासून छंद म्हणून स्टॅम्प गोळा करत असल्याचे सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये शास्त्रज्ञ असलेले डॉ. एमआर रमेश कुमार (64) म्हणाले. एमआर त्यांचे वडील एम व्ही रंगनाथ यांनाच या क्षेत्रातील आपले गुरू मानतात.
'माझ्याकडे रामायणावर आधारीत 300 हून अधिक तिकिटांचा संग्रह आहे आणि 100 हून अधिक विशेष टपाल कव्हर आहे. भारतीय रामायणावरील 10-12 तिकिटं सोडली आहेत, तर नेपाळ, इंडोनेशिया, थायलंड, लाओस, कंबोडिया, कोरिया, फिलीपिन्स आणि सिंगापूरने या महाकाव्यातील उपाख्यानांवरील अनेक स्टॅम्प प्रसिद्ध केले आहेत, असे रमेश कुमार म्हणाले.
कुमार यांच्याकडे विशेष पोस्टल कव्हरचा संग्रह देखील आहे, ज्यात रामलीला आणि राम वन गमन पथ मार्गाचा समावेश आहे.
रमेश कुमार यांचा संग्रह केवळ रामायणावरील शिक्क्यांपुरता मर्यादित नाही.
कुमार यांच्याकडे अंटार्क्टिका, पहिले आणि दुसरे महायुद्ध, भारताची जैवविविधता, त्याचे भौगोलिक संकेतक, भारताचे अनसन्ग हिरो, शास्त्रज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, महिला स्वातंत्र्यसैनिक, देशाचा सांस्कृतिक वारसा, पोर्तुगीज भारत, ऑलिम्पिक आणि समुद्रशास्त्र अशा विविध थीम्सवरील तिकीटांचा संग्रह आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.