कुठ्ठाळी : राष्ट्रीय महामार्ग (National Highway) बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळासमोरील (Goa Medical Collage Hospital) भुयारी मार्ग (Subway) जलमय (under water) झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका पादचारी, दुचाकी (Motorcyle) व चारचाकी वाहन (Vehicle) चालकांना बसत आहे. हा भुयारी मार्ग गुरांचेही (cattle) आश्रयस्थान बनला आहे. त्यामुळे वाहनचालक आणि लोकांचीही (Peoples) गैरसोय होत आहे.
गोवा वैद्यकीय इस्पितळातून किंवा दंतवैद्यकीय इस्पितळांतून ये - जा करणाऱ्या वाहनचालकांना याच भुयारी मार्गाचा अवलंब करून मडगाव किंवा पणजीचा मार्ग गाठावा लागतो. भुयारी मार्गातील पाणी खेचून काढण्यासाठी लावलेल्या पंपमुळे पाण्याची पातळी कमी झाली नाही. खेचलेले पाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारामध्ये साचते. त्यामुळे पादचारी भुयारी मार्गावरून रस्त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते.
भटक्या गुरांचेही आश्रयस्थान
या भुयारी मार्गात भटकी गुरांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे पादचारी तसेच वाहनचालकांना बराच त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्यावेळी धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे वाहनचालकांना समोर बसलेल्या गुरांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. संबंधितांनी पाण्याचा निचरा नीट कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच गुरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालक तसेच लोकांकडून केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.