Goa: नशा मुक्त भारत अभियान मोहिमेची गाण्यांच्या माध्यमातून जागरूकता

नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत जिल्हा समिती आयोजित ऑनलाईन एकल गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना स्वतंत्र दिवस सोहळ्यादिनी बक्षिसे प्रदान करण्यात आली.
नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत जिल्हा समिती आयोजित ऑनलाईन एकल गीत गायन स्पर्धेतील विजेती रक्षा शेट्टी व मंगेश शेट्ये यांच्या समवेत उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर.
नशा मुक्त भारत अभियाना अंतर्गत जिल्हा समिती आयोजित ऑनलाईन एकल गीत गायन स्पर्धेतील विजेती रक्षा शेट्टी व मंगेश शेट्ये यांच्या समवेत उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: नशा मुक्त भारत अभियाना (Drug Free India Campaign) अंतर्गत जिल्हा समिती आयोजित ऑनलाईन एकल गीत गायन स्पर्धेतील (Singing Competitions) विजेत्यांना स्वतंत्र दिवस सोहळ्यादिनी बक्षिसे प्रदान करण्यात आली.

गायनाचे प्रथम बक्षीस आकाश मंगेशकर (मंगेशी), द्वितीय अनिकेत दंड्डीकर (मडगाव), उत्तेजनार्थ कुमारी रक्षा शेट्टी(वास्को) यांना प्राप्त झाले. गीतलेखनासाठी उत्कृष्ट गीतासाठी श्री मंगेश शेट्ये (वास्को) यांना बक्षीस प्राप्त झाले. वरील सर्व विजेत्यांना ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री श्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.मडगाव दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित केला होता. नशा मुक्त भारत अभियान मोहिमेच्या दिशेने जागरूकतेसाठी वरील गाण्यांचा उपयोग केला जाईल असे सूत्रांनी कळविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com