'आधी सरकारचे कौतुक आणि क्षणातच मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप;' आता यावर काय बोलणार? आलेमाव यांची भाजपवर शेलकी टीका

Yuri Alemao: सत्ताधारी मंत्र्यावर झालेल्या आरोपामुळे विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे.
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak

Yuri Alemao: विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपताच सभापती रमेश तवडकर यांनी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर शरसंधान केले. भाजपच्या विद्यमान मंत्र्यावर झालेल्या या आरोपामुळे भाजपसह राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झालीय.

सत्ताधारी मंत्र्यावर झालेल्या आरोपामुळे विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली असून गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सदर मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

तर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकार वरच टीका केलीय.

''आज माननीय राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी भ्रष्टाचारमूक्त म्हणून भाजप सरकारचे कौतुक केले, अन त्यानंतर काही मिनिटांनीच सभापती रमेश तवडकर यांनी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला.

एवढे झाल्यावर भाजप सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारावर आणखी काही बोलण्याची गरज आहे का?'' असे म्हणत विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी विद्यमान भाजप सरकारलाच भ्रष्टाचारी ठरवले आहे.

Yuri Alemao
Govind Gaude: मंत्री गावडे राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जा; अमित पाटकर आक्रमक

तर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी गावंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधानसभा सभापतींचे आरोप गंभीर आहेत, त्यामुळे कारवाई अपरिहार्य आहे असे नमूद करून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

सभापतींनी केलेला कला आणि संस्कृती मंत्रालयात घोटाळा झाल्याचा आरोप आणि मंत्र्याने निधीचा गैरवापर केल्याचा त्यांचा आरोप याकडे अत्यंत गांभीर्याने आणि लक्ष देण्याची गरज आहे.

सरकारने आता त्वरित या प्रकरणाची सर्वसमावेशक आणि स्वतंत्र चौकशी सुरू केली पाहिजे. तसेच संबंधित मंत्र्याने पद सोडावे आणि चौकशीला सामोरे जावे अशी माझी मागणी असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com