Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Mardangad Fort Conservation: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी (8 ऑगस्ट) फोंडा येथील ऐतिहासिक मर्दनगडाच्या संवर्धनावर झालेली चर्चा फलदायी ठरली.
Minister Subhash Phaldesai
Minister Subhash PhaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शुक्रवारी (8 ऑगस्ट) फोंडा येथील ऐतिहासिक मर्दनगडाच्या संवर्धनावर झालेली चर्चा फलदायी ठरली. या विषयावर मांडण्यात आलेल्या खासगी ठरावावर पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मर्दनगडाचे संरक्षण आणि विकास करण्याची ग्वाही दिल्यानंतर अखेर तो ठराव मागे घेण्यात आला. या चर्चेदरम्यान सुदिन ढवळीकर यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना मांडली, तर माजी मंत्री गोविंद गावडे यांनी पोवाडा सादर करुन सभागृहात एक वेगळेच वातावरण निर्माण केले.

आमदार दाजी साळकर यांनी मर्दनगडाच्या संरक्षणाबाबत खासगी ठराव मांडला. फोंड्यातील हा किल्ला दुर्लक्षित असून त्याची अवस्था बिकट झाली आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे तात्काळ संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या ठरावात म्हटले होते.

Minister Subhash Phaldesai
Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

सुदिन ढवळीकर यांचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव

दरम्यान, या ठरावावर चर्चा सुरु असताना सुदिन ढवळीकर यांनी एक दूरदृष्टीचा प्रस्ताव मांडला. त्यांनी सांगितले की, फोंडा (Ponda) येथील सिद्धनाथ पर्वत, मर्दनगड आणि फर्मागुडी येथील छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला ही तिन्ही ऐतिहासिक स्थळे महत्त्वाची आहेत. या तिन्ही ठिकाणांना जोडणारा एक भव्य केबल-स्टेड ब्रिज (Cable-stayed bridge) उभारण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली. ढवळीकर म्हणाले की, या पुलामुळे पर्यटकांना एकाच वेळी या तिन्ही ऐतिहासिक स्थळांचा अनुभव घेता येईल आणि वरुन संपूर्ण फोंडा परिसराचे विहंगम दृश्य पाहता येईल. यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे काम हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

याचबरोबर, मर्दनगड हा छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित असल्याने त्या ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारणे आवश्यक आहे. असे केल्यास या स्थळाला योग्य मान मिळेल आणि ते एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असेही ते म्हणाले.

Minister Subhash Phaldesai
Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

गोविंद गावडे यांचा पोवाडा ठरला लक्षवेधी

याच चर्चेदरम्यान, माजी मंत्री गोविंद गावडे यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. त्यांनी दिवंगत आमदार आणि प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वाघ यांनी लिहिलेला एक पोवाडा सभागृहात सादर केला. मर्दनगडाच्या शौर्याचा आणि इतिहासाचा गौरव करणारा हा पोवाडा सादर करताना गावडे यांनी सभागृहात एक वेगळेच वातावरण निर्माण केले. त्यांच्या पोवाड्याने मर्दनगडाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समोर आले. त्यांच्या या सादरीकरणाला सभागृहातील सर्वांनी शांतपणे दाद दिली.

Minister Subhash Phaldesai
Goa Assembly Session: वाचनालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याचा विचार करू, CM सावंतांचे विधानसभेत आश्‍‍वासन

मंत्र्यांच्या आश्वासनानंतर ठराव मागे

दुसरीकडे, या सर्व मागण्या आणि सूचना ऐकल्यानंतर पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सभागृहात यावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, "मर्दनगड हे संरक्षित स्थळ म्हणून अधिसूचित (notified) करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होताच, तिथे तातडीने सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाईल."

मंत्र्यांनी पुढे सांगितले की, "त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि सिद्धनाथ पर्वत, मर्दनगड आणि फर्मागुडी यांना जोडणाऱ्या केबल-स्टेड ब्रिजचे कामही हाती घेतले जाईल."

मंत्र्यांनी दिलेल्या या ठोस आश्वासनानंतर ठराव मांडणारे आमदार दाजी साळकर यांनी आपला ठराव मागे घेतला. या घडामोडींमुळे मर्दनगडाच्या संवर्धनाचा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता, आता तो प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com